
खापरखेडा पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन,७ मोटारसायकल केल्या हस्तगत…
छत्तीसगड येथुन दोन संशयितांनी ताब्यात घेऊन खापरखेडा पोलिसांनी उघड केले ३ मोटारसायकल चोरीचे गुन्हे,७ मोटारसायकल केल्या जप्त खापरखेडा…..
खापरखेडा(नागपुर)प्रतिनिधी – नागपुर ग्रामीण परिसरात मोटार सायकल चोरीचे घटना वाढलेली असल्याने पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व उपविभागिय पोलिस अधिकारी व सर्व ठाणेदार यांना मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास निर्देश दिलेले आहेत


त्याअनुषंगाने उपविभागिय पोलिस अधिकारी कन्हान संतोष गायकवाड व ठाणेदार खापरखेडा धनाजी जळक यांनी पथक तयार करून मोटारसायकल चोरांबाबत गोपनिय माहीती काढुन
आरोपीचा शोध घेतला असता पथकास गोपनीय माहीती मिळाली की सदरची वाहन चोरी ही रेकॅार्डवरील गुन्हेगार १) कैलास हरिचंद्र तांडेकर वय ३२ वर्ष, २) आकाश हरिचंद्र तांडेकर वय ३० वर्ष दोन्ही रा. बिना संगम यांना चिखलीकला, पोलिस चौकी उमरानाला, जिल्हा छिंदवाडा (म.प्र) यांनी केली असुन त्या दोघांनाही ताब्यात घेऊन त्याचा पीसीआर घेऊन छिंदवाडा, बैतुल येथुन ७ मोटार सायकली जप्त केल्या तसेच खापरखेडा व लगतचे
पोलिस स्टेशन परिसरातील मोटर सायकल जप्त करून गुन्हे उघड करण्यात आले

त्यामध्ये पोलिस स्टेशन खापरखेडा गुन्हयातील ३ मोटार सायकल व पोलिस स्टेशन कोराडी नागपुर शहर गुन्हयातील ३ मोटर सायकल व एका मोटार सायकल मालकचा शोध सुरू आहे. पो.स्टे. खापरखेडा येथील डी बी पथकांने मोटर सायकल चोरीचा गुन्हा उघड करण्यास व ७ मोटर सायकली हस्तगत करण्यास यश प्राप्त झाले. यातील पाहीजे असलेला आरोपी विक्की तुरकाम रा.
कोराडी हा फरार असुन त्यांचा शोध सुरू आहे.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलिस
अधिक्षक रमेश धुमाळ, उपविभागिय पोलिस अधिकारी कन्हान विभाग कन्हान डॉ. संतोष गायकवाड, ठाणेदार धनाजी जळक यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि आरती नरोटे, डी. बी. पथक येथील प्रफुल राठोड, शैलेश यादव, कविता गोंडाने, मुकेश वाघाडे, राजु भोयर, राजकुमार सातुर यांचे पथकाने पार पाडली आहे.


