मायक्रो फायनान्स कंपनीची रोकडवर दरोडा टाकणारे आरोपी ४ तासाचे आत मौदा पोलिसांचे ताब्यात….
मायक्रो फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकास भर रस्त्यात दरोड्याच्या उद्देशाने लुटणारे सर्व आरोपी ४ तासाचे आत मौदा डी बी पथकाने केले जेरबंद…..
मौदा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. ०९/१०/२०२४ रोजी फिर्यादी राहुल जनार्धन सावळे, वय ३१ वर्ष, रा लापका रोड, मौदा यांनी पोलिस स्टेशन मौदा येथे येवुन तक्रार दिली की, फिर्यादी हा भारत इनक्लुजन लिमीटेड मायक्रो फॉयनान्स्, मौदा येथे समुह मँनेजर या पदावर काम करतात
दि. ०९/१०/२०२४ रोजी त्याच्या कामाप्रमाणे त्याने गादा व नेरी तसेच सोनेगाव (राजा) येथुन बचत गटाचे महीलांची मिंटीग घेवुन तिन्ही गावातुन बचत गटाचे एकुण १,३१,८१४/-रु. वसुली करुन ते पैसे सोनेगाव (राजा) येथुन घेवुन एका काळ्या बॅगेत ठेवुन काळ्या रंगाचे होन्डा युनिकॉन मो.सा. क्र. MH/40/CP/0327 ने मौदा येथे निघाला असता उनगाव फाट्यावर दुपारी २/३० वा ते ३/०० वा. दरम्याण एक काळ्या रंगाचे स्प्लेंडर मोटार सायकलवरील दोन तसेच पांढ-या रंगाचे ऑक्टीव्हा मोपेडवर तिन इसम असे ५ मुले अंदाजे २० ते २७ वयोगटातील फिर्यादी राहुल जनार्धन सावळे यास अडवुन त्याला गाडीवरुन खाली पाडुन त्यास धक्काबुक्की करुन फिर्यादीचे जवळ असलेली बँग ज्यामध्ये नगदी १,३१,८१४/-रु., सॅमसंग कंपनीचा टॅब कि. ९,०००/-रु. बायोमॅट्रीक अंदाजे कि. ३,०००/-रु. असा एकुण १,४३,८१४/- रु. चा माल जबरीने हिसकावुन उनगाव दिशेने पळुन गेले. असे फिर्यादीचे तक्रारीवरुन पोलिस स्टेशन मौदा येथे कलम ३१० (२) भा.न्या.स. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे ठाणेदार पोलिस स्टेशन मौदा यांनी डी बी पथकास आदेश देवुन त्वरीत अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकरीता रवाना केले सदर पथक परीसरात अज्ञात आरोपींचा शोध घेत असतांना गोपनीय माहिती मिळाली कि, सदर गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार आरोपी कुनाल उर्फ दाना ईश्वर पुडके, वय १९ वर्षे, रा. सोनेगाव (राजा), ता. कामठी, जि. नागपुर याने प्रेमनगर, नागपुर येथील सदर गुन्ह्यातील इतर आरोपीना कलेक्शनचे पैश्याबाबत माहिती देवुन त्यांचे सदरची घटना घडवुन आणल्याचे माहिती प्राप्त झाली सदर माहितीचे आधारे झेंडा चौक, शांतीनगर, नागपुर परिसरातुन आरोपी १) कुनाल उर्फ दाना ईश्वर पुडके, वय १९ वर्षे, रा. सोनेगाव (राजा), ता. कामठी, जि. नागपुर, २) आशीष उर्फ मेंढा विजय मेंढे, वय २७ वर्षे, रा. झेंडा चौक, प्रेमनगर, शांतीनगर, नागपुर, ३) गौरव उर्फ मन्नत रतन वर्मा, वय १९ वर्षे रा. झेंडा चौक, प्रेमनगर, नागपुर व तिन अल्पवयीन बालकास ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन नगदी ७०,०००/-रु., गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटार सायकल कि. १,५५,०००/-रु. तसेच ४ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल कि. १,००,०००/-रु. असा एकुण ३,२५,०००/-रु. चा माल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,उपविभागिय पोलिस अधिक्षकारी,कन्हान संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनात वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे, पोउपनि महेश बोथले, पोहवा संदीप कडु, गणेश मुदमाळी, रुपेश महादुले, नापोशि दिपक दरोडे यांनी केली आहे.