
वाळुची चोरटी वाहतुक करणारे भिवापुर पोलिसांचे ताब्यात…
अवैध रेतीची(वाळुची) चोरटी वाहतुक करणाऱ्यांना ताब्यात घेऊन, वाहनासह एकुण ३०,६०,००० /- रू चा मुददेमाल जप्त….
भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पावसाळा जसा जसा जवळ येतोय तसेच वाळुचे अवैधरित्या उत्खनन व वाहतुक करणारे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक यांनी सर्व प्रभारिंना दिले होते त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन भिवापुर येथे दि १०/०६/२०२४ रोजी फिर्यादी हे पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, मौजा नांदा फाटा येथे अवैधरीत्या विनापरवाना रेती (वाळु)लोड करून चोरटी वाहतुक करीत आहे.


अशा खात्रीशीर बातमीवरून मौजा नांदा फाटा येथे अवैध रेती संबंधाने अचानक नाकाबंदी केली असता दोन टिप्पर येतांना दिसुन आले. १) टिप्पर क, एम एच ४० एके ६२७२ चा चालक विशाल गोकुलदास डडमल वय १८ वर्ष रा नवेगाव देशमुख ता भिवापुर २) क्लिनर शंकर गंगाधर जांभुळे वय २१ वर्ष रा जांबुळघाट ता चिमुर जि चंदपुर ३) टिप्पर क्रमांक एम एच ४० बिजी ९८५८ चा चालक राहुल राजु वाकडे वय २८ वर्ष रा आंबेनरी ता चिमुर जि चंद्रपुर ४) क्लिनर नथ्थु अर्जुन भुजाडे वय ४१ वर्ष रा भुयार जि भंडारा ५)प्रणय विजय आठमांडे वय २१ वर्ष रा भुयार ता पवनी जि भंडारा यांचे ताब्यातील टिप्परची तपासणी केली असता रेती भरून दिसुन आल्याने दोन्ही टिप्पर चालकांना विचारपुस केली असता त्यांचे ताब्यातील टिप्पर क्रमांक एम एच ४० एके ६२७२ चे चालकाने सदर टिप्पर मालक १) सारंग सुरेश ब्रम्हे वय २८ वर्ष रा मांगरूड ता उमरेड जि नागपुर यांचे सांगणेवरून वरून खातखेडा रेतीघाट ता पवनी भंडारा येथुन भरून नेत असल्याचे सांगीतले. तसेच टिप्पर क्रमांक एम एच ४० बीजी ९८५९ चा चालक २) राहुल राजु वाकडे वय २८ वर्ष रा आंबेनेरी ता चिमुर जि चंद्रपुर याने सांगितले कि सदर
टिप्पर मालक प्रतिक रोजेंद्र ब्रम्हे वय ३० वर्ष रा मांगरूड ता उमरेड जि नागपुर यांचे सांगणेवरून खातखेडा रेतीघाट ता पवनी यांचे सांगणेवरून अवैधरित्या विनापरवाना सदर दोन्ही टिप्परमध्ये शासनाचा महसुल बुडवुन तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात रेती भरून नागपुर येथे वाहुन आणतांना मिळुन आल्याने टिप्पर क एम एच ४० एके ६२७२ मध्ये ०६ ब्रॉस रेती किंमती ३०,००० /- व टिप्पर एकुण किंमती १५,३०,०००/-रू, तसेच टिप्पर क्रमांक एम एच ४० बीजी ९८५९ मध्ये ०६ ब्रॉस रेती किंमती ३०,००० /- रू, एकुण कि १५,३०,०००/–रू, दोन्ही मिळुन एकुण ३०,६०,००० /- रू चा मुददेमाल विना परवाना अवैधरीत्या रेती ची चोरटी वाहतुक करतांना मिळून आल्याने आरोपी नामेयांचेविरुद्ध कलम ३७९, १०९ भा. द. वी. सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता, सहकलम २१,०४ खाणी आणि खनिजे अधिनियम १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि. १९८४ अन्वये पो. स्टे. भिवापुर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला
आहे.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार अपर पोलिस
अधिक्षक रमेश धुमाळ,उपविभागिय पोलिस अधिकारी,उमरेड राजा पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे भिवापुर येथील ठाणेदार सहा. पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल,नापोशि रविंद्र जाधव, पोशि दिपक ढोक, निकेश यांनी पार पाडली.



