
बनावट परवाना दाखवुन रेतीची चोरटी वाहतुक करणारे अरोली पोलिसांचे ताब्यात….
बनावट परवाना दाखवुन अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे अरोली पोलिसांचे तावडीत सापडले….
अरोली(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी अवैध रेती उत्खनन करणारे तसेच त्याची अवैधरित्या चोरटी वाहतुक करणारे यांचेवर कठोर कार्यवाही करण्याचे सर्व प्रभारींना आदेशीत केले होते, त्याअनुषंगाने दि. ०७/१०/२०२४ रोजी रात्री पोलिस ठाणे अरोली येथील पथक हद्दीत पेट्रोलिंग करित असतांना ठाणेदार सपोनि स्नेहल राउत यांना गोपनीय माहीती मिळाली की घोटीटोक वरून अरोली रोडनी रेतीने भरलेले तिन टिप्पर जात आहे


अशा फोनद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे लागलीच चैखाळा फाटा येथे नाकाबंदी करुन सदरचे टिप्पर थांबवुन पाहणी केली असता १) टिप्पर क्र एम एच ४० सी.एम. ६८४५, २) टिप्पर क्र एम एच ४० सी.एम. ३८६३ ३) टिप्पर क्र एम एच ४० सी.एम. ३६३९ चे चालकाने तिन्ही ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा जास्त रेती भरुन वाहतुक करतांना मिळुन आल्याने तसेच वरील सर्व आरोपींनी संगणमत करून तिन्ही ट्रकचा रेती वाहतुक परवाना खोटा व बनावटी बनवुन हे खरा असल्याचे दाखविल्याने विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर १) टिप्पर क्र एम एच ४० सी.एम. ६८४५ अंदाजे २५,००,०००/ व ८ ब्रास रेती कि. २४,०००/- व चालक सद्दाम सब्बीर अली सैय्यद वय २८ वर्ष रा. कन्हान याचे ताब्यातुन रेडमी कंपनीचा अॅड्रॅाईड मोबाईल कि. १०,०००/- रू २) टिप्पर क्र एम एच ४० सी.एम. ३८६३ अंदाजे २५,००,०००/ व ७ ब्रास रेती कि. २१,०००/- व चालक रिमनलाल बिसरूराम शाहु वय ३९ वर्ष रा. कामठी याचे ताब्यातुन सॅमसंग कंपनीचा अॅड्रॅाईड मोबाईल कि. १०,०००/- रूपये. ३) टिप्पर के एम एच ४० सी.टी. ३६३९ अंदाजे ३५,००,०००/ व १० ब्रास रेती कि.३०,०००/- व चालक सुरेश रामभाउ रोकडे रा. संघर्ष नगर नागपुर ४)चालक अविनाश कृष्णा तायवाडे वय २८ वर्ष रा. खरबी नाका जवाहर नगर भंडारायाचे ताब्यातुन विवो कंपनीचा अॅड्रॅाईड मोबाईल कि. १०,०००/- रूपये. ५) क्लिनर आकाश गुलाब पेंदाम वय २६ वर्ष रा. खरबी नाका जवाहर नगर भंडारा याचे ताब्यातुन आयटेल कंपनीचा साधा मोबाईल कि. २,०००/- रू ६) प्रणय हिरामण कुंभलकर वय २८ वर्ष रा. सेलु ता. कामठी याचे ताब्यातुन विवो कंपनीचा अॅड्रॅाईड मोबाईल कि. २०,०००/- रू. वरिल आरोपींच्या ताब्यातुन एकुण ८६,२७,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक, रमेश धुमाळ, उपविभागिय पोलीस अधिकारी, रामटेक रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहल राऊत, ठाणेदार, पोलीस स्टेशन अरोली पोउपनि सुशिल कुमार सोनवाने, पोहवा संदिप बाजनघाडे, पोशि लक्षमीकांत मुदनर यांनी केली.


