
करोडोंची आर्थिक फसवनुक करणार्या टोळीस नागपुर ग्रामीण पोलिसांनी केले गजाआड,करोडोचा घोटाळा उघड…
कोलकता येथुन संपुर्ण भारतात नागरिकांची करोडो रूपयांची सायबर व आर्थिक फसवणुक करणारी टोळी नागपुर ग्रामीण पोलिसांनी केली गजाआड….


सावनेर(नागपुर)प्रतिनीधी – मेहनत न करता व झटपट पैसा कमाविणे ही देशभरातील अनेक तरूणांची ईच्छा असुन त्याकरिता अनेक तरूणांनी नागरिकांची विविध प्रकारे सायबर व आर्थिक फसवणुक करण्याच्या व्यवसायाची निवड केली आहे. या व्यवसायाकरिता ते वेगवेगळ्या टोळ्यांप्रमाणे काम करीत असुन फसवणुकीचे कॉल करण्यासाठी सीमकार्ड उपलब्ध करून देणे, फसवुकीद्वारे प्राप्त पैसे घेण्यासाठी लागणारे बैंक खाते गोळा करणे, त्या बँक खात्यांमधुन पैसे काढणे व नागरिकांना विविध आमीष देवुन त्यांची फसवणुक करण्याकरिता त्यांना फोन करणे असे या विविध टोळयांचे काम आहेत. या सर्व टोळयांचे प्रमुख हे स्वतःला व्हाईट कॉलर दाखविण्याकरिता वकीली, हॉटेल व ईतर असे व्यवसाय करतात. अशाच कोलकता पश्चिम बंगाल येथील एका टोळीतील सदस्यांच्या मुसक्या नागपुर ग्रामीण पोलिसांनी आवळल्या आहेत.

याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील आरोपी वैभव दवंडे रा. आजनी कामठी व कमलेश गजभिये रा. कावरापेठ नागपुर यांनी सावनेर तसेच कळमेश्वर तालुक्यातील काही लोकांना ते अनाथ आश्रमासाठी काम करीत असुन अनाथ आश्रमांना देणगीचे पैसे घेण्यासाठी काही बँक खात्यांची आवश्यकता आहे. अशी माहीती देवुन जर तुम्ही बैंक खाते दिले तर तुम्हाला 4000/- रू. मिळतील असे आमीष दाखवुन नागरिकांचे विविध बँकांमध्ये खाते उघडुन त्या खात्यांचे पासबुक, चेकबुक, एटीएम पीन व एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवुन घेवुन ते एटीएम कार्ड कुरीअर द्वारे कलकत्ता येथे पाठविले. तसेच नमुद आरोपींनी प्रफुल सुधाकर गहुकर, प्रफुल शामकांत गणोरकर व प्रतिक दयाराम गहुकर यांचेही अशाचप्रकारे खाते उघडले. त्या खात्यांचे डिटेल्स व एटीएम कार्ड कोलकता येथे आरोपी अलाउद्दीन शेख उर्फ श्रीमंत बछर याला पाठविले. काही दिवसांत प्रफुल सुधाकर गहुकर, प्रफुल शामकांत गणोरकर व प्रतिक दयाराम गहुकर यांना त्यांचे मोबाईलवर त्यांचे बैंक खात्यामध्ये लाखो रूपयांचे व्यवहार झाल्याबाबतचे मॅसेज येत होते. परंतु त्या खात्यांमध्ये त्यांनी पैसे टाकले किंवा काढले नसल्याने यातील फिर्यादी व तक्रारदार प्रफुल सुधाकर गहुकर यांनी पोलिस स्टेशन सावनेर येथे त्यांचे खात्यांचा गैरवापर झाल्याबाबत तक्रार नोंदवली होती

सदर तक्रारीच्या अनुषंगाने. सावनेर पोलिसांनी यातील आरोपी वैभव दवंडे, कमलेश गजभिये व कलकत्ता येथे राहणारे आरोपी यांचेविरूध्द भारतीय न्याय संहिता 2023 चे 317(4), 316(2), 318(4), 61(2), 3(5) या कलमान्वये गुन्हा नोंद करून सदर गुन्हयाचा तपास सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल म्हस्के (भा.पो.से.) यांनी स्वतःकडे घेतला. त्यात आरोपींनी वापरलेल्या बँक खात्यांमध्ये असलेले 15,00,000/- रू. पोलीसांनी फ्रिज केले असुन आरोपी प्रणब मोंडल याने त्याचे वडीलांच्या नावावर केलेली 36,00,000/- रू. एफ.डी. सुध्दा फ्रिज करण्यात आलेली आहे. तसेच आरोपींकडुन एक मर्जीडीज कंपनीची कार व एक अल्टो कंपनीची कार जप्त करण्यात आली असुन आरोपींनी घेतलेल्या ईतर संपत्ती व गुंतवणुकीबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. तसेच आतापर्यत तपासामध्ये एकुण 42 आरोपी निष्पन्न झाले असुन आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
त्यातप्रमाणे आरोपींनी सावनेर, कळमेश्वर व नागपुर शहरातील अंदाजे 100 ते 150 लोकांचे बॅक खात्यांचा गैरवापर फसवणुकीचे पैसे घेण्यासाठी केला असुन त्यापैकी फक्त 65 बँक खात्यांमध्ये 7 कोटी रूपायांपेक्षाही जास्त रक्कम जमा झाली असल्याचे पोलीसांचे तपासात निष्पन्न झाली असुन हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आरोपींनी ज्या लोकांची सायबर व आर्थिक फसवणुक केली आहे. त्यांचे पैशे त्यांना परत मिळण्यासाठी गुन्हयामध्ये एम.पी.आय.डी. कायदयातील कलमांचा समावेश करण्यात आला असुन महाराष्ट्र राज्यातील ज्या लोकांची जिओ कंपनीचे टावर लावण्याचे नावावर सायबर व आर्थिक फसवणुक झाली आहे त्यांनी पोलिस स्टेशन सावनेर येथे येवुन आपले बयान नोंदवावे असे आव्हाहन त्यांना करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल म्हस्के, सपोनि. आशिषसिंग ठाकुर, पोहवा राजेन्द्र रेवतकर, रविन्द्र चटप, मपोहवा संगिता गावंडे, नापोशि सतिष राठोड, पोशि नितेश पुसाम मनिष सोनोने यांनी केली


