ग्रामीण भागातुन बकर्या चोरणार्या दोन टोळ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नागपूर ग्रामीण घटकाअंतर्गत बकरी चोरी करणाच्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याकरीता नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक  हर्ष पोद्दार यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांचे
मार्गदर्शनात दोन विशेष पथके तयार केले होते  विशेष पथकाने जिल्हयातील विवीध पोलीस स्टेशनला नोंद गुन्हयांचा अभ्यास करुन प्रत्येक बकरी चोरीच्या घटनेमधील आरोपींच्या गुन्हे करण्याच्या कार्यपध्दतीवर लक्ष केंद्रीत करुन समांतर तपास सुरु केला. तपासादरम्यान प्राप्त तांत्रीक पुराव्यांच्या आधारे व खबरीने दिलेल्पा गोपनिय माहितीवरुन दि. २८/११/२०२३ रोजी कन्हान येथील तारसा रोड जवळ बकरी चोरी करणाऱ्या दोन टोळया
चारचाकी वाहनासह जेरबंद केल्या ज्यामध्ये

पहीली टोळी – 





१) सोहेल अली वल्द कादर अली वय २१ वर्ष, रा. कामगार नगर, भोलाराम किराणा स्टोअर्स जवळ, नारी रोड, नागपूर



२) तस्लीम रजा उर्फ राजा वल्द शेख मक्सद वय २२ वर्ष रा. तेजीया कॉलनी, टायर चौक, उपलवाडी, नागपूर आणि



३)अरबाज वल्द हमीद खान वय २३ वर्ष रा. ब्लॉक नं. ५०, क्वॉर्टर नं. ७८२, म्हाडा कॉलनी, नारी रोड नागपूर

यांनी नागपूर ग्रामीण जिल्हयातील खालील पोलिस स्टेशन हद्दीत बकरी चोरी केल्याचे उघड झाल्याने त्यांचे
कडून ०१ मोबाईल फोन, ०१ चारचाकी फोर्ड फियास्टा वाहन क्र. MH 06 AS 7792 आणि रोख १,१२,५००/- रुपये असा एकुण ५,२२,५०० /- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
१) पो.स्टे. रामटेक गुन्हे रजी. नं. ७३८ / २०२३ कलम ३७९ भादवि
२) पो.स्टे. रामटेक गुन्हे रजी.नं. ८२८ / २०२३ कलम ३७९ भादवि
३) पो.स्टे. रामटेक गुन्हे रजी. नं. ८५३ / २०२३ कलम ३७९ भादवि
४) पो.स्टे. कोंढाळी गुन्हे रजी. नं. ७३० / २०२३ कलम ३७९ भादवि
५) पो.स्टे. कोंढाळी गुन्हे रजी.नं. ७६४ / २०२३ कलम ३७९ भादवि
६) पो.स्टे. कोंढाळी गुन्हे रजी.नं. ७८२ / २०२३ कलम ३७९ भादवि
७) पो.स्टे. देवलापार गुन्हे रजी.नं. ४३१९ / २०२३ कलम३७९भादवि
८) पो.स्टे. परशिवनी गुन्हे रजी. नं. ३९४/२०२३ कलम ३७९ भादवि
९) पो.स्टे. MIDC बोरी गुन्हे रजी.नं. ३९७/२०२३ कलम ३७९ भादवि
१०) पो.स्टे. खापा गुन्हे रजी.नं. ४७१ / २०२३ कलम ३७९ भादवि

दुसरी टोळी- 

१) रुपेश राजू पाली वय ३२ वर्ष रा. पवनी ले-आउट, डोरल्या काच कंपणी जवळ, पिवळी नदी, उपलवाडी, नागपूर

आणि त्याचा साथीदार

२) मुन्नी सरदार रा. यशोधरा नगर, नागपूर

यांनी नागपूर ग्रामीण जिल्हयातील खालील पोलिस स्टेशन हद्दीत बकरी चोरी केल्याचे उघड झाल्याने त्यांचे कडून ०१ मोबाईल फोन, ०१ वाहन शेवलेट कंपणी स्पार्क वाहन क्र. MH 43 AJ 2129 आणि रोख ५०,००० /- रुपये असा एकुण २,५५,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

१) पो.स्टे. रामटेक गुन्हे रजी.नं.७५९/२३ कलम ३७९ भादवि
२) पो.स्टे. रामटेक गुन्हे रजी.नं.७७४ / २०२३ कलम ३७९ भादवि
३) पो.स्टे. रामटेक गुन्हे रजी.नं. ८४१ / २०२३ कलम ३७९ भादवि
४) पो.स्टे. खापरखेडा गुन्हे रजी.नं. ६३७ / २०२३ कलम ३७९भादवि
५) पो.स्टे. खापरखेडा रजी.नं. ६६० / २०२३ कलम ३७९ भादवि

वरील दोन्ही टोळीतील सदस्यांकडून एकुण ७, ७७,५००/रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून नागपूर ग्रामीण जिल्हयातील बकरी चोरीचे एकुण १५ गुन्हे उघडकीस आले आहे.
वरील दोन्ही टोळीतील आरोपी हे बकरी चोरी करण्यापुर्वी ग्रामीण भागात जावून टेहाळणी करायाचे व मध्यरात्रीच्या वेळी संधी मिळताच त्यांचे जवळील चारचाकी वाहनात बकऱ्या टाकुन चोरी करायचे या दोन्ही टोळींनी नागपूर ग्रामीण हद्दीत गोरगरीबांच्या बकया चोरी करुन त्यांचे आर्थीक नुकसान करण्याचा अक्षरश: धुमाकूळ घातला होता, अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकांनी रात्रंदिवस अथक परिश्रम करुन अतिशय कौशल्यपुर्ण समांतर तपास केला व आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश  कोकाटे,सहा. पोलिस निरीक्षक, राजीव कर्मलवार, आशिषसिंह ठाकूर, पोलिस उपनिरीक्षक बटूलाल पांडे, सहा. फौजदार ज्ञानेश्वर राऊत, पोलिस हवालदार दिनेश आधापूरे, विनोद काळे, ईक्बाल शेख, रोशन काळे, प्रमोद भोयर, शंकर मडावी, उमेश फुलबेल, नितेश पिपरोदे, संजय भदोरिया, चालक पोलीस हवालदार अमोल कुथे, मुकेश शुक्ला तसेच सायबर सेलचे पोलिस नायक सतिष राठोड, स्नेहलता ढवळे, यांनी पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!