
कत्तलीसाठी गोतस्करी करणारे वाहन स्थागुशा पथकाचे ताब्यात…
अवैधरित्या जनावरांची कत्तलीकरीता वाहतुक करणार्यावर स्थागुशा पथकाची कार्यवाही,६ गोवंशसह एकुण ६,१०,००० / – रू चा मुद्देमाल जप्त,आरोपी कारचालक फरार….
नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने खास करुन गोतस्करी यांच्या संबंधाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ओमप्रकाश कोकाटे व सर्व प्रभारी यांना योग्य त्या सुचना देऊन आदेशीत केले होते त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे स्थानिक गुन्हे शाखा यांनी आपले अधिनस्थ असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना योग्य त्या सुचना दिल्या होत्या त्यानुसार दिनांक १४.०१.२०२४ रोजी स्थागुशा चे पथक पोलिस स्टेशन पारशिवनी परीसरात पथकासह पेट्रालिंग करीत असतांना एका गोपनिय माहीतगाराकडुन मिळालेल्या माहीती वरून एक सिल्वर रंगाची इनोव्हा वाहन क्र एम एच ४० के आर ६५७७ या वाहनात अवैध रित्या गोवंश जनावरे यांना नायलॉन दोरीने बांधुन
निदर्यतेने वागणुक देवुन, त्यांना चारा पाणी न देता कत्तली करीता घेवुन जात असतांना पारशिवनी शिवार आमडी पुलाचे जवळ नाकाबंदी केली असता एक इनोव्हा वाहनाचा चालक सदर वाहन
सोडुन पळुन गेला. त्याचे ताब्यातील वाहन चेक केले असता त्यामध्ये एकुण ६ गोवंश जनावरे व कालवड मिळुन आले.अंदाजे किंमत १,१००००/- व इनोव्हा कार क एम एच ४० आर के ६५७७ कि ५,००,००० / – रू असा एकुण ६,१०,००० /- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर कारचा चालक फरार असुन त्या चालकाचे विरूध्द पोलिस स्टेशन पारशिवनी येथे कलम ११ (१)ड, प्राणि संरक्षण कायदा ५ (१) (ए) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा सहकलम १८४ मोटर वाहन कायदा अन्वयें गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई हर्ष ए.पोद्दार (भा.पो.से.), पोलिस अधिक्षक, नागपुर ग्रामीण व अपर पोलिस अधिक्षक डॉ संदीप पखाले यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश
कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा रोशन काळे, नितेश पिपरोदे, भोला मडावी, पोना विरेंद्र नरड यांचे पथकाने पार पाडली.




