व्हिडीयोगेम पार्लरवर MIDC बोरी पोलिसांचा छापा,जुगारसाहीत्य केले जप्त…
MIDC बुटीबोरी पोलिसांनी व्हिडीयो गेम पार्लरवर अवैधरित्या जुगारावर टाकला छापा, ७९,४०० /- रू. चा मुद्देमाल केला जप्त…
बुटीबोरी(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,MIDC बुटीबोरी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडुन खबर मिळाली की, मौजा टेंभरी येथील महाकाल ट्रेडर्स बिल्डींग मटेरीयल येथील दुकानाचे बाजुला असलेल्या एका दुकानामध्ये हनुमंत सोनोने हा व्हिडीओ गेम पार्लर मधील इलेक्ट्रॉनीक मशिनवर त्याचे
फिरत्या आकड्याचे आधारे तेथे येणाऱ्या ग्राहकांकडून नगदी पैसे रक्कम स्विकारून त्या मोबदल्यात त्यांना तेवढ्या रकमेची चाबी भरून देवुन स्वतःचे आर्थीक फायद्याकरीता पैज लावून हारजितचा जुगार खेळीत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरुन पोलिस पथकाने टेंभरी चौकालगत असलेल्या नमुद ठिकाणी छापा जुगार कायद्यान्वये छापा टाकुन कारवाई केली
नमुद ठिकाणी टाकलेल्या छाप्यात आरोपी हनुमंत आनंदराव सोनोने, वय ४४ वर्षे, रा. शुभम लाकडे यांचे घरी किरायाने टेंभरी ता. हिंगणा जि. नागपुर हा दुकानात आलेले ग्राहक आरोपी
सुशिल गजानन भजभुजे, वय २५ वर्षे, रा. वार्ड नं. ०३ टेंभरी ता. हिंगणा जि. नागपुर
अमोल कवडुजी उईके वय २६ वर्षे रा. झेंडा चौक, वायगांव गोंड
रोड समुद्रपुर ता. समुद्रपुर जि. वर्धा
यांचेकडुन पैसे स्वीकारुन दुकानात असलेल्या इलेक्ट्रीक मशिनच्या सहाय्याने चावी फिरवुन हार जितचा जुगार खेळताना मिळुन आला. त्यानंतर पंचनामा कारवाई करुन सदर शटरच्या दुकानातुन
वेगवेगळया कंपनीच्या ०६ ईलेक्ट्रॉनीक मशिन, त्यांच्या चाब्या व जुगारचे नगदी १४०० /- रू. असा एकुण जुगार कि.७९,४००/- रू. चा माल जप्त करण्यात आला. दरम्यान सदर प्रकरणी अधिक चौकशी केली असता सदरच्या व्हिडीओ पार्लरचे मालक हे
शुभम जगदीश चचाने रा. टेंभरी व बाबु शेख रा. बुटीबोरी
असल्याचे निष्पन्न झाले. सदर प्रकरणी आरोपी हनुमंत आनंदराव सोनोने, वय ४४ वर्षे, रा. शुभम लाकडे यांचे घरी किरायाने टेंभरी ता. हिंगणा जि. नागपुर, सुशिल गजानन भजभुजे, वय २५ वर्षे, रा. वार्ड नं. ०३ टेंभरी ता. हिंगणा जि. नागपुर, अमोल कवडुजी उईके
वय २६ वर्षे रा. झेंडा चौक, वायगांव गोंड रोड सुमुद्रपुर ता. समुद्रपुर जि. वर्धा, व्हिडीओ पार्लरचे मालक हे शुभम जगदीश चचाने रा. टेंभरी व बाबु शेख रा. बुटीबोरी या सर्वांविरुध्द महाराष्ट्र जुगार अधिनियम तसेच भारतीय दंड संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी पुजा गायकवाड यांचे मार्गदर्शात ठाणेदार सहा. पोनि राजीव कर्मलवार, सहा. पोनि भुजबळ, पोलीस उप निरीक्षक राम खोत तसेच पोलिस शिपाई विनोद अहिरकर, विनायक सातव, श्रीकांत गौरकार यांनी केली.