सावनेर पोलिसांनी घरफोडीचे ८ गुन्हे उघड करुन,७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…
सावनेर पोलिसांनी उघड केले घरफोडीचे ८ गुन्हे, ३ आरोपींसह ७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…..
सावनेर(नागपुर) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी किंमती मालाविषयी गुन्हे उघड करण्यासाठी सर्व प्रभारी यांना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने
पोलिस स्टेशन सावनेर येथे दाखल असलेले अप क्र. २८/२४ कलम ४५८, ३८०, ५११ भादवी सहकलम ४, २५ आर्म अॅक्ट मध्ये अटक केलेला आरोपी
१) आकाश विलास लांजेवार वय २४ वर्ष,
२) सुरज संजय कोहळे वय २१ वर्ष दोन्ही रा. नंदनवन झोपडपटटी नागपुर
यांना अटक करून त्यांचे कडुन घरफोडी करण्याकरीता वापरलेली i20 कार क्रं. MH -02/9725 ,०१ तलवार व घरफोडीचे साहीत्य असा १,००, ३९० /- रू चा मुददेमाल जप्त करून त्यांचे कडुन पाटणसावंगी व सावनेर परिसरातील पोलिस स्टेशन सावनेर येथे दाखल असलेले घरफोडीचे ८ गुन्हे उघड करून चोरी केलेल्या मालापैकी सोनार
अंकुश गणपतराव नेरकर वय ३३ वर्ष रा. दिघोरी नागपुर व
सचीन दत्तात्रय कावळे रा. इतवारी नागपुर
यांचेकडुन १८.९९ तोळे सोने व ४ तोळे चांदीचे दागीने किमंत
६,७९, ३४२/- रूपये असा एकुण किंमती ७,७९, ७३२/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक नागपूर ग्रामीण, अपर पोलिस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल मस्के, पोलिस निरीक्षक रवीन्द्र मानकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे, शरद भस्मे, चालक सफौ राजु कडु, पोलिस हवालदार रवीन्द्र चटप, अतुल खोडनकर
अविनाश बाहेकर, माणिक शेरे, चालक पोहवा प्रितम पवार, नायक पोलिस शिपाई रंजन काबळे, पो शि अंकुश मुळे, अशोक निस्ताने यांनी केली आहे.