गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करणारा कंटेनर सावनेर पोलिसांनी शिताफीने घेतला ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला तंबाकु व गुटख्याची वाहतुक करणारा कन्टेनर सावनेर पोलिसांनी शिताफीने पकडला,  कंटेनरसह एकुन ६३,७५००० /- रु चा मुद्देमाल केला जप्त…

सावनेर(नागपुर) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक: २०/०१/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. सुमारास सावनेर गुन्हे प्रकटीकरण पथकास खबरीद्वारे गुप्त माहीती मिळाली की पांढुर्णा कडुन हेटी मार्गे तेलकामठी कडे एक कंटेनरअवैधरित्या तसेच महाराष्ट्रात प्रतिबंधीत अशा तंबाकु व गुटखा भरून जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सावनेर पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथक हे लगेच  मुखबीराने सांगितलेल्या प्रमाणे नमुद ठिकाणी जावुन पाहणी केली असता हेटी कडुन तेलकामठी कडे एक मोठा कंटेनर जात असतांना दिसला जसे आम्ही आपले सरकारी वाहन त्या कंटेनर च्या मागे लावुन त्या कंटेनर चा पाठलाग करू लागलो तसेच कंटेनर चालकाने आपले कंटेनर हेटी -तेलकामठी हायवे रोडवर लावुन शेती झाडझुडपी चा फायदा घेवुन शेतात पळुन गेला कंटेनर क्र: RJ 11 GC 5813 ची पंचासमक्ष पाहणी केली असता कंटेनर मध्ये काही घरगुती सामानासह त्याच्या मधोमधात प्रतिबंधीत अवैध गुटका व सुंगधित तंबाखु लपवुन घेवुन जात असल्याने दिसुन आले वरुन सदरचा कंटेनर क्र: RJ 11 GC 5813 पोलिस स्टेशन ला आणुन पाहनी केली असता सदर कंटेनर मध्ये प्रतिबंधीत अवैध गुटका व सुंगधित तंबाखु एकुन किंमत ३३,७५,००० /- रु चा  मिळुन आला त्याबाबत अन्न व औषधी प्रशासन विभाग यांना माहिती देवुन श्रीमती ए. व्ही. बाभरे अन्न व सुरक्षा अधिकारी नागपुर यांनी पंचनामा कार्यवाही करुन सदर प्रकरणात ३३,७५००० /- रु.चा प्रतिबंधीत गुटखा व सुगंधित तबांखु जप्ती करण्यात आली तसेच कंटेनर क्र: RJ 11 GC 5813 चा कि अ. ३०,०००० /- रु असा एकुन ६३,७५,०००/- रू. माल ताब्यात घेवुन जप्त करण्यात आला असुन सदर प्रकरणात कलम – ३२८, २७२, २७३, १८८ भादवि सह कलम अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ व त्या अंतर्गत नियम व नियमन २०११ चे कलम २६ (१), २६ (२), २७ (३) (e), ३० (२) (a) सहवाचन कलम ३ (१), (ZZ), (iv), (iii), (v) शिक्षापात्र कलम: ५९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस
अधिक्षक  संदिप पखाले, सहायक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सावेनर, अनिल म्हस्के  यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस निरीक्षक रविंद्र मानकर ठाणेदार पोलिस स्टेशन सावनेर यांचे नेतृत्वात सपोनी शरद भस्मे, सफौ
गणेश रॉय, पोहवा  अविनाश बाहेकर,  रवि मेश्राम, मपोहवा प्रमिला चौधरी,पोशि दाउद मोहम्मद, नापोशि अंकुश शास्त्री, पोशि. किशोर राठोड यांनी केली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!