सावनेर SDPO यांचे पथकाची अवैध धंद्यावर कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अवैधरीत्या देशी विदेशी दारुची वाहतुक करणाच्या व बाळगणार्या आरोपीविरुध्द उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर यांचे पथकाची कारवाई….

सावनेर(नागपुर) ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १७/०२/२०२४ रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर विभाग यांचे आदेशाने त्यांचे पथक अवैध दारू विक्री व जुगार बाबतच्या रेड करणेकामी खाजगी वाहनाने पोलिस स्टेशन सावनेर परिसरात फिरत असतांना,मुखबीरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, मौजा सावनेर येथुन केळवद कडे एक ईसम पांढऱ्या रंगाच्या बिना नंबरच्या अॅक्टिवा मोटरसायकलवर समोर देशी व विदेशी दारू घेवुन जात आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून सावनेर ते केळवद रोडने उड्डानपुलाचे खाली जावुन नाकाबंदी केली असता समोरून एका पांढऱ्या रंगाचे बिना नंबरचे मोपेड
मोटरसायकलवर एक ईसम समोर काहीतरी संशयितरित्या घेवुन जातांना दिसुन आल्याने त्यास पोलिस पथकाने थांबवुन
त्याचे मोटरसायकलवर समोर ठेवलेल्या मुद्देमालाची पाहणी केली असता ईसम  – ललीत जगदीश उपाध्याय वय २९ वर्ष रा. वार्ड क्र. ११ चिकन मार्केट सावनेर हा आपल्या वाहनात अवैधरीत्या विनापरवाना एक पांढऱ्या रंगाच्या विना नंबरची अॅक्टीव्हा ६ जि मोपेड मो. सा. किंमती ५०.००० /- रू मध्ये १) एक खाकी रंगाचा खरडयाच्या बॉक्समध्ये अवैधरीत्या विनापरवाना





१) भिंगरी देशी दारू ९० एम. एल. च्या १०० निपा किंमती ३५००/- रू



२)भिंगरी देशी दारू च्या दोन बॉक्स एकुण ९६ निपा किंमती ६.७२० / रू



३) ऑफिसर चॉईस ०६ निपा किंमती ९००/- रू

४) रॉयल स्टेज विदेशी दारू च्या १० निपा किंमती १८००/- रू

५) ईम्पेरीयल ब्लु विदेशी दारूच्या १२ निपा किंमती १९२०/- रू

६) रॉयल स्टेज विदेशी दारू च्या १२ निपा किंमती २९६० /- रू

असा एकुण ६७०००/- रू. चा मुद्देमाल मिळुन आला. सदर मुद्देमालाबाबत आरोपी ललीत उपाध्याय यास अधिक विचारपुस
केली असता आरोपी नामे – २) देवेंद्र खंगारे रा. झेंडा चौक पहलेपार यांचे सांगणेवरून विक्री करीता वाहतुक करीत असल्याचे सांगितले. आरोपीतांविरूद्ध कलम ६५ (अ), ६५ (ई) म.दा.का. सहकलम १०९ भादवि प्रमाणे अन्वये होत असल्याने आरोपी १) ललीत जगदीश उपाध्याय वय २९ वर्ष रा. वार्ड क्र. ११ चिकन मार्केट सावनेर व २) देवेन्द्र खंगारे रा. झेंडाचौक पहलेपार सावनेर याचेविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे मौजा बोरूजवाडा येथे मालु पेपर मिलजवळ उमाशंकर ठाकुर हा त्याचे मालकीचे गायीच्या गोठ्यामध्ये अवैध्यरित्या देशी दारूची विक्रि करित आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर खबरेवरून पथकाने  सावनेर ते नागपुर रोडवरील मालु पेपर मिल समोरील आरोपी उमाशंकर रामशरण ठाकुर वय २७ वर्ष धंदा मजुरी रा. वार्ड न. १ माळेगाव ता. सावनेर जि. नागपुर त्याचे गोठयाची झडती
घेतली असता गोठ्याचे मागे असलेल्या खोलीमध्ये एका लाल रंगाच्या प्लॉस्टीक पिशवीमध्ये

१) भिंगरी १८० एम. एल च्या ८६ प्लास्टीक बॉटल प्रत्येकी किंमत ७०/- रू एकुण किंमती ६०२० /- रू.

२) वन प्लस कंपनीचा व जिओ कंपनीचे सिम असलेला मोबाईल किंमती १५,५००/- रू

३) नगदी २२४०/- रू. असा एकुण २३,७६०/- रू चा
मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरूद्ध कलम ६५ (ई) म.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे) अपर पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर विभाग सावनेर  अनिल म्हस्के, महिला पोलिस हवालदार संगिता कोवे, पोलिस शिपाई नितेश पुसाम, महिला पोलिस शिपाई अश्विनी वांढरे यांनी पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!