स्वतःहाच्या आर्थिक फायद्याकरीता वाळुची चोरी करणाऱ्याच्या विशेष पथकानी आवळल्या मुसक्या….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अवैधरित्या वाळु चोरी करणाऱ्या आरोपीच्या पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने आवळल्या मुसक्या पोलिस स्टेशन, मौदा येथे गुन्हा नोंद…

नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, सततचे होणारे वाळु चोरीचे गुन्हे व ईतर अवैध गुन्ह्यंना जरब बसावी म्हनुन पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी  विशेष पोलिस पथकाची नेमणुक केली यांच  पथकाने पोलिस स्टेशन, मौदा परीसरात अवैधरित्या, विनापरवाना १४ चक्का एलपी ट्रक गाडी क्र. एम. एच. ४८/ ए.जी. २४१६ भंडाराकडुन मौदा मार्ग नागपुरकडे वाळु एलपी ट्रकमध्ये लोड करून वाहतुक करीत असतांना मिळुन आला. सदर वाहनावर मिळून आलेला ईसम





१) कलीम खान नसीर खान वय ४९ वर्ष, रा. पठान चौक नागपुरी गेट पोलिस ठाणे जवळ (एम. एच. ४८/ ए. जी.२४१६ चा चालक)



२) शेख अलीम शेख कलीम वय ३६ वर्ष, रा. पठान चौक नागपुरी गेट पोलिस ठाणे जवळ,(एम. एच. ४८/ ए.जी. २४१६ चा क्लीनर)



असे सांगीतले. त्यांचे ताब्यातील एलपी ट्रक वाहनाचा नंबर एम. एच.४८/ ए. जी. २४१६ असा असुन, सदर वाहनाची पाहणी केली असता,

१) एलपी ट्रक किंमती २५,००,००० /- रूपये,
२) अंदाजे १२ ब्रास वाळु, प्रत्येकी ब्रास ५०००/- रूपये  एकूण ६०,००० / – रूपये,

३) दोन आरोपीतांचे प्रत्येकी ०१, असे एकुण ०२ वेगवेगळया कंपनीचे जुने वापरलेले  ॲन्ड्राईड मोबाईल एकुण किंमती २०,०००/- रूपये
४) नगदी एकुण २०३० /- रूपये असा एकुण २५८२०३० /- रूपयेचा मुद्देमाल मिळुन आलेला आहे. वर नमुद वर्णनाचा मुद्देमाल मिळुन आलेल्या इसमांना मुद्येमालाविषयी विचारणा केली असता, वर नमुद वाहन एक पिवळया व हिरव्या रंगाचे टाटा कंपनीचे १४ चक्का एलपी ट्रक, ज्याचा नंबर एम. एच. ४८/ ए.जी. २४१६ चा मालक नामे

आकाश भोंगाडे रा. कामठी हे असुन एम. एच. ४८/ ए.जी. २४१६ या वाहनाचा ताबा सोहेब खान वय ४० वर्ष, रा. जमील कॉलनी अमरावती यांचा आहे. वाहन ताबा मालक यांचे सांगणेप्रमाणे सदर वाळु) बफेरा (गोंदीया) येथुन अवैधरित्या स्वत:चे आर्थीक फायद्याकरीता लोड करून भंडाराकडुन मौदा मार्ग अमरावती येथे विना रॉयल्टी घेवुन जात असल्याचे सांगीतले. पोलिस ठाणे मौदा येथे दि. २९/१२/२०२३ रोजी अप. क्र. १२४४/२०२३ कलम ३७९, १०९, ३४ भारतीय दंडविधान संहीता – १८६०, सहकलम ४८(८) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, सदर गुन्ह्यात ०१ वाहन, १२ ब्रास रेती, ०२ मोबाईल आणि नगदी पैसे असा २५, ८२,०३० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक संदीप पखाले यांचे मार्गदशनाप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित पांडेय विशेष पोलिस पथक प्रमुख.. यांनी त्यांचे पथकातील पोहवा ललीत उईके, नापोशि प्रणय बनाफर, पोशि कार्तीक पुरी, बालाजी बारगुले, शुभम मोरोकर यांचेसह केली असुन, वेळीच घटनास्थळ पंचनामा व मुद्देमालासह २ आरोपीस अटक करण्यात आली असुन, ईतर २ पाहीजे आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. पुढील तपास पोलिस स्टेशन मौदा करीत आहे..





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!