दोन संशईतांना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेने उघड केले चोरी व जबरी चोरीचे गुन्हे….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

दोन संशईतांना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने चोरी व जबरी चोरीचे दोन गुन्हे केले उघड… 

नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन, कारवाई करणे कामी पोलिस अधिक्षक, अबिनाश कुमार  यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांना आदेश दिले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी पोउपनि. साईनाथ पुयड यांचे पथकाला नांदेड जिल्हयात चोरी करणारे आरोपींचा शोध घेवुन, गुन्हे उघडकीस आणने बाबत आदेशित केले होते.





त्यानुसार  (Operation flush out) अंतर्गत दिनांक २८/०९/२०२४ रोजी साईनाथ पुयड, पोलीस उप निरीक्षक, स्था. गु. शा.,यांचे पथकाने नांदेड शहरात व परिसरात चोरी करणारे आरोपींची शोध घेतला असता त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन संशईत ईसम १) शेख असीफ शेख युसुफ वय २४ वर्ष व्यवसाय पान टपरी रा. किवळा ता. लोहा जि. नांदेड व २) ज्ञानेश्वर बालाजी जिगळे वय २४ वर्ष व्यवसाय शेती रा. किवळा ता. लोहा जि. नांदेड यांना ताब्यात घेतले



त्यांना विचारपुस केली असता त्यांनी पोलिस स्टेशन सोनखेड व नांदेड ग्रामीण येथील दोन गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. त्यांचे ताब्यातुन एक चोरीचा मोबाईल, एक चोरीची शाईन मोटार सायकल व एक गुन्हयात वापरलेली प्लॅटीना मोटार सायकल असा एकुण रु. ४५,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला



सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, अपर पोलिस अधिक्षक,भोकर खंडेराव धरणे, अपर पोलिस अधिक्षक,नांदेड सुरज गुरव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, उदय खंडेराय,पोलीस उप निरीक्षक साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार किशन मुळे, गंगाधर घुगे, विलास कदम, संतोष बेलुरोड, बालाजी कदम, राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, तिरुपती तेलंग, यांनी पार पाडली आहे.

 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!