अट्टल घरफोड्या चॅाकलेट्या यास ताब्यात घेऊन उघड केले आणखी ५ गुन्हे…
खुनासह आठ घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अट्टल गुन्हेगार चॅाकलेट्या यास ताब्यात घेऊन नविन 05 घरफोडीचे गुन्हे केले उघड, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कामगिरी
नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसण्यासाठी व किंमती मुद्देमाल संबंधी गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्याबाबत पोलिस अधीक्षक श्रीक्रुष्ण कोकाटे यांनी पोलिस निरीक्षक, उदय खंडेराय, स्था.गु.शा., नांदेड यांना आदेशीत केले होते.
त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथके तयार करुन सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हयासंबंधाने माहिती घेत असतांना स्थानिक गुन्हे शाखेतील पथकातील अधिकारी यांना एक खुनाचा गुन्हा व आठ घरफोडीच्या गुन्हयामधील फरार आरोपी संतोष ऊर्फ चॉकलेटया वापुराव भोसले, वय 45 वर्ष, रा. कुरुळा ह.मु. वहाद, ता. कंधार जि. नांदेड हा त्याचे राहते गावी वहाद ता. कंधार येथे आसल्याची गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावून मिळालेल्या माहितीप्रमाणे जावुन त्याचा शोध घेतला असता आरोपी संतोष ऊर्फ चॉकलेटया वापुराव भोसले, वय 45 वर्ष, रा. कुरुळा ह.मु. वहाद, ता. कंधार जि. नांदेड हा
मिळुन आला त्यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने खालील प्रमाणे गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.
1) पो.स्टे. मुखेड गुरनं 07/2024 कलम 457,380 भादंवि
2) पो.स्टे. मुखेड गुरनं 37/2024 कलम 457, 380 भादंवि
3) पो.स्टे. मुखेड गुरनं 115/2024 कलम 457, 380 भादंवि
4) पो.स्टे. देगलूर गुरनं 157/2024 कलम 457,380 भादंवि
5) पो.स्टे. कंधार गुरनं 363/2023 कलम 457, 380 भादंवि
सदर आरोपीकडून वरील गुन्हयातील मुद्देमाल 48 ग्रॅम सोन्याचे दागिने, 200 ग्रॅम चांदीचे दागिणे व नगदी 21,000/- रुपये असा एकूण 3,73,200 /- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नमूद आरोपीस पुढील तपासकामी पो.स्टे. मुखेड येथे देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अपर पोलिस अधीक्षक, नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक,भोकर,डॅा खंडेराव धरणे यांचे मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक, स्था.गु.शा, नांदेड, सपोनि रवि वाहुळे, सफौ माधव केंद्रे, पोहवा गुंडेराव करले, नापोशि संजीव जिंकलवाड,पोशि देविदास चव्हाण,रणधिरसिंह राजबन्सी, मोतीराम पवार,ज्वालासिंघ बावरी, गजानन बयनवाड, बालाजी यादगिरवाड, चापोशि कलीम शेख,
हनुमानसिंह ठाकूर यांनी पार पाडली आहे.