गावठी बनावटीचे पिस्टल व मॅग्जीनसह एकास गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….
गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व 02 रिकाम्या मॅग्झीनसह एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात…..
नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसणेकामी व अग्नीशस्त्र वापरुन गुन्हे करणारे व अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा उदय खंडेराय यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था. गु.शा. चे पथकाला आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने दि.(10) रोजी गुप्त बातमीदाराकडून गोपनीय बातमी मिळाली की कापुस संशोधन केंद्रा समोरील केळी मार्केट टी पॉईंटकडे जाणाऱ्या रोडवर एक इसम गावठी पिस्टल बाळगुन असून तो विक्री करण्यासाठी येणार आहे अशा खात्रीशिर माहितीवरुन सदरची माहिती वरिष्ठांना देवून वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष शेकडे,पोलिस अंमलदार असे कापुस संशोधन केंद्रा समोरील केळी मार्केट टी पॉईंटकडे जाणाऱ्या रोडवर गेले असता सदर ठिकाणी सापळा लावून संशयीत इसम राधेशाम पंजाबराव भालेराव, वय 24 वर्ष, व्यवसाय मजूरी, रा.
सखोजीनगर, नांदेड यास ताब्यात घेवून त्याचेकडून बेकायदेशीरीत्या विक्रीसाठी आणलेली एक गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व 02 रिकाम्या मॅग्झीन असा एकूण 41,000/-रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अपर पोलिस अधीक्षक, नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक,भोकर, खंडेराव धरणे यांचे मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक, स्था.गु.शा, नांदेड, सपोनि संतोष शेकडे, पोउपनि हरजिंदरसिंघ चावल, पोहवा रुपेश दासरवार, बालाजी तेलंग, पोशि साहेबराव कदम,तानाजी येळगे, अनिल बिरादार,मोतीराम पवार,राजीव बोधगिरे, अकबर पठाण, इसराइल शेख,गजानन
बयनवाड यांनी केली