विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडीचे २ आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…
पोलिस स्टेशन विमानतळ हद्दीतील सुर्योदय नगर येथील घरफोडीच्या गुन्हयातील दोन आरोपीना 5,49,130/- रुपयाचे मुद्येमालासह स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांनी केली अटक….
नांदेड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,घरफोडीच्या गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, नांदेड यांनी पोलिस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.
त्याअनुषंगाने दिनांक 08/01/2024 रोजी स्थागूशा चे सपोनि माने यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, कॅनलरोड वर सुर्योदयनगर येथे चोरी केलेला आरोपी थांबला असल्याची माहीती मिळाल्याने सपोनि माने व त्यांची टिम मिळालेल्या माहीती प्रमाणे आरोपी नामे शेख अदील शेख चॉद वय 22 वर्षे रा. सन्ना कॉलनी नांदेड यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता तो त्याचे दोन साथीदार 1)सय्यद जैम सय्यद अहेमद अली रा. लेबरकॉलनी नांदेड व शारेख खान रा. आसरा नगर
असे मिळुन चोरी केल्याचे सांगुन त्यांने चोरी केलेले एकुण 92 ग्रॅम सोने व 280 ग्रॅम चांदीचे दागीने, मोबाईल असे एकुण 4,53,130 रुपये माल जप्त करण्यात आला तसेच आरोपी नामे सय्यद जैम सय्यद अहेमद अली रा. लेबरकॉलनी नांदेड यास ताब्यात घेवुन त्याचे कडुन चोरीचे नगदी 35,000/- रुपये व गुन्हयात वापरलेली मो.सा. व मोबाईल असा एकुण 96,000/- रुपयाचा मुद्देमाल दोन आरोपी कडुन 5,49,130/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
आहे. सदर आरोपीस पोलिस स्टेशन विमानतळ गुरनं 429/2023 कलम 457,380 भादवी गुन्हयाचे तपास कामी देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी श्रीक्रुष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक, नांदेड,डॅा खंडेराव धरणे, अपर पोलिस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक स्थागूशा नांदेड, सपोनि पांडुरंग माने, पोहवा गंगाधर कदम, पोशि मोतीराम पवार,तानाजी येळगे, मारोती मोरे, महेश बडगु गजानन बयनवाड, राजु सिटीकर, दिपक ओडने व चालक गंगाधरघुगे व हेमंत बिचकेवार स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली