
गाईची कत्तल करुन गोमांस विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्यास भद्रकाली पोलिसांनी घेतले ताब्यात…
गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्रीकरीता नेणारा आरोपी जेरबंद,भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी…
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे व त्यांचे गोमांस विक्री करणारे आरोपींवर कडक कारवाई करणेबाबत तसेच आयुक्तालय हद्दीत दिवसा व रात्री प्रभावीपणे गस्त घालुन गोवंशीय जनावरांची कत्तल व त्यांचे मांस विक्रीस कायमचा प्रतिबंध करणेबाबत संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक शहर यांनी सक्त आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने .किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ – १, डॉ. सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलिस आयुक्त, सरकारवाडा विभाग,गजेन्द्र पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संतोष नरूटे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), भद्रकाली पोलिस ठाणे, नाशिक शहर यांचे मार्गदर्शना नुसार गुन्हे शोध पथकाचे सपोनि सत्यवान पवार यांचे अधिपत्याखाली कार्यरत असलेले
पोहवा नरेंद्र जाधव, नापोशि महेशकुमार बोरसे, पोशि सागर निकुंभ, योगेश माळी असे बागवानपुरा भागात गस्त करीत असतांना दि. १८/०२/२०२४ रोजी सकाळी ०७:३० वा. चे सुमारास दुधबजार, भद्रकाली,नाशिक बाजुकडुन एक रिक्षा क एमएच १५ ओ. के ५५४३ मध्ये एक इसम कत्तल केलेले गोवंशीय जनावराचे मांस नेत आहे.
अशी गोपनीय माहीती प्राप्त झाल्याने त्यांनी लागलीच सदर रिक्षाचा शोध घेवुन चालकास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव


नुरमोहम्मद उस्मान कुरेशी, वय ३९ वर्षे, रा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाचे बाजुला, पंचशिल नगर, भद्रकाली नाशिक

असे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचे रिक्षाची पाहणी केली असता त्यामध्ये अंदाजे १०० किलो वजनाचे गोवंशीयजनावराचे मांस मिळुन आल्याने त्याबाबत त्याचेकडे विचारता त्याने सदरचे मांस हे गोवंशीय असल्याचे सांगितले आहे. तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची हत्याबंदी कायदा लागु असतांना सदर कायद्याचे उल्लंघन करीत सदर आरोपीने बेकायदेशीरपणे गायांची कत्तल करून सदर कत्तल केलेले गोवंशीय जनावराचे मांस हे चोरटयारितीने विक्री करण्याच्या उद्देशाने मांस व ऑटोरिक्षा असे एकुण ३५,०००/- रूपये किंमतीचे मालासह मिळुन आल्याने व सदर मांसापासुन सामान्य जनतेच्या जिवीतास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरण्याचा संभव असतांनाही त्यांनी अशा प्रकारे कत्तल केलेले मांस विक्रीकरीता बाळगतांना मिळुन आल्याने त्यास सदर मांस व त्याचे ऑटोरिक्षासह ताब्यात घेवुन त्याचेविरूध्द भद्रकाली पोलिस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ५४/२०२४ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५ (क), ९ (अ) सह भादंवि कलम २६९ गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोहवा नरेंद्र जाधव हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक शहर, किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ – १, डॉ. सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलिस आयुक्त, सरकारवाडा विभाग, नाशिक शहर, गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संतोष नरुटे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), भद्रकाली पोलिस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनिससत्यवान पवार, पोहवा नरेंद्र जाधव, नापोशि महेशकुमार बोरसे,पोशि सागर निकुंभ,योगेश माळी, निलेश विखे, अशांनी पार पाडली आहे.



