
सिकलकर वस्ती येथे घडलेल्या खुनी हल्ला प्रकरणातील दोन मुख्य आरोपी गुंडा विरोधी पथकाच्या ताब्यात….
नाशिकरोड पोलिस स्टेशनचे हद्दीत सिकलकर वस्ती येथे घडलेल्या व दोघांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने केलेल्या खुनी हल्ल्यातील फरार २ आरोपी गुंडा विरोधी पथकाच्या ताब्यात….
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी पुजा पवन वैष्णव रा. पंचवटी नाशिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नाशिकरोड येथील शिकलकर वस्ती येथे जुन्या भांडणाची कुरापत काढुन पुजा वैष्णव यांचे वडील प्रकाश कांबळे व चुलत भाऊ अतिष कांबळे यांना दहा ते बारा इसमांनी शिकलकर वस्ती, शिवमंदीर असलेल्या दुकानात कोयते व लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर जखमी केले म्हणुन होते त्यावरुन त्यांचे तक्रारीवरुन आरोपी नामे


१) हुसेन शेख २) सकलेन शेख ३) रजिक बाकसी ४) सोहेल शेख ५) अमन शेख ६) इमरान शेख ७) निरंक नरोटे ८) ऐजाज रफीक मनीयार उर्फ फज्जा ९) सादिक सलिम शेख १०) फरदीन ११)
अक्षय घोडेराव उर्फ निखील राजेंद्र घोडेराव १२) चैतन्य बोंदरे

व इतर पाच ते सहा इसम यांचेवर नाशिकरोड पोलिस स्टेशन
येथे गुरनं ६६ / २०२४ भादंविक ३०७, १४३, १४७, १४८, १४९, शस्त्र अधिनियम ४/२५, मपोकाक १३५ प्रमाणे दिनांक २ जानेवारी २४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानुसार पोलिस आयुक्त,नाशिक शहर संदीप कर्णीक, पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सह पोलिस आयुक्त(गुन्हे) डॉ.सिताराम कोल्हे यांनी गुंडा विरोधी पथकास सदर गुन्हयातील आरोपींना ताब्यात घेण्याबाबत आदेशीत केले होते.
त्याअनुषंगाने दिनांक ०२/०२/२०२४ रोजी गुंडा विरोधी पथकाचे पोहवा विजय सुर्यवंशी यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की आरोपी नामे १) सादिक सलीम शेख २) सकलेन फिरोज शेख हे रात्रीच्या वेळी ठक्कर बस स्टँड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने सदरची माहिती प्रभारी अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देवुन सपोनि ज्ञानेश्वर मोहिते व पथकातील अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदिप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे यांनी ठक्कर बस स्टँड परिसरात रात्रीचे वेळी सापळा लावुन आरोपी नामे

१) सादिक सलीम शेख वय १९ वर्षे रा. सिन्नर फाटा, नाशिक
२) सकलेन फिरोज शेख वय १८ वर्षे रा. सिन्नर फाटा, नाशिक
यांना दिनांक ०३/०२/२०२४ रोजी मध्यरात्री शिताफीने ताब्यात घेतले असुन पुढील कारवाई साठी नाशिकरोड पोलिस ठाणे
यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी संदीप कर्णीक, पोलिस आयुक्त नाशिक शहर, प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त (गुन्हे), डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलिस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे यांनी
संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.


