खुनाचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीस गुंडा विरोधी पथकाने घातल्या बेड्या…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दीड वर्षापासुन फरार आरोपीस गुंडा विरोधी पथकाने ठोकल्या बेडया….

नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि.(११) रोजी गुंडा विरोधी पथकातील पोलिस अंमलदार नाशिक रोड रेल्वे स्टेशन, उपनगर पोलिस ठाणे हद्दीत गस्त करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की,  संजय जाधव नावाचा एक रिक्षा चालक पोलिसांची गाडी किंवा पोलिस दिसताच असेल त्या ठिकाणावरुन संशयास्पदरित्या निघुन जातो अशी बातमी मिळाली.







सदरची माहिती पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांना देवुन त्यांचे सुचनेनुसार पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त (गुन्हे), संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार प्रविण चव्हाण व गणेश भागवत यांनी दोन दिवस सतत नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसर, देवळाली कॅम्प भागात संशयीत इसमाची अधिक माहिती काढुन शोध घेतला असता दि( १३) रोजी देवळाली कॅम्प परिसरात संशयीत संजय जाधव इसम मिळुन आला असता त्यास सापळा रचुन ताब्यात घेवुन त्याची विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव संजय जाधव असे सांगितले परंतु त्याचे बोलण्यावरुन अधिक संशय आल्याने त्याची कसून चौकशी करता त्याने त्याचे नाव सुशिल उर्फ गोरख रामभुल बेद वय ३७ वर्षे रा. फ्लॅट नं १४, पार्क अव्हॅन्यु, भारत गॅस गोडावुन समोर, देवळाली कॅम्प, नाशिक असे सांगितल्याने त्याची नाशिक शहरातील सर्व पोलिस स्टेशनचे रेकॉर्डवरील माहिती काढली असता सदर संशयीत इसम हा नाशिकरोड पोलिस ठाणे गुन्हा रजि. नं. २५ / २०२३ भादंवि ३०७ वगैरे प्रमाणे दि.( १९) रोजी दाखल असलेल्या गुन्हयातील फिर्यादी सोनसिंग शिकलकर व साक्षीदार अनमोलसिंग शिकलकर यांना आरोपी शंकर चावरीया, शुभम चावरीया व गोरख बेद यांनी वास्को चौक नाशिकरोड येथे जुन्या भांडणाची कुरापत काढुन जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवार व लोखंडी रॉडने डोक्यास मारहान केली म्हणुन गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाले पासुन आरोपी सुशिल उर्फ गोरख रामभुल बेद हा आपले स्वतःचे अस्तित्व लपवुन फरार होता. गुंडा विरोधी पथकाने त्यास ताब्यात घेवुन पुढील कारवाईकामी नाशिकरोड पोलिस ठाणेचे ताब्यात दिले आहे.



सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, पोलिस उपायुक्त (गुन्हे). प्रशांत बच्छाव,सहा पोलिस आयुक्त (गुन्हे), संदीप मिटके, यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलिस अंमलदार मलंग गुंजाळ, डी. के. पवार, विजय सुर्यवंशी, राजेश सावकार, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, गणेश भागवत, प्रविण चव्हाण, निवृत्ती माळी, अक्षय गांगुर्डे, गणेश नागरे, नितीन गौतम, सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!