अवैध शस्त्रासह सराईत गुन्हेगारास गंगापुर पोलिसांनी घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गंगापूर पोलिसांनी केली अटक…





नाशिक (शहर प्रतिनिधी) – गावठी कट्टा व एक रिकामी पुंगळी बाळगणार्‍या चार सराईत गुन्हेगारांना गंगापूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. पोलिसांनी कारच्या सीटाखाली लपवलेला गावठी कट्टा व एक रिकामी पुंगळी जप्त केली. इम्रान शेख (वय २५, रा. गणेश चौक, संजीवनगर, अंबड लिंकरोड, सातपूर, नाशिक), शेखर कथले (२९, रा. शिवाजीनगर, ता.सेलू, जि. परभणी, अरबाझ खान पठाण (२३ रा. डिग्रसवाडी, सेलू, जि. परभणी), राहुल क्षत्रिय (२४, रा. संत जनार्दन नगर, नांदुरनाका, नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.



लोकसभा निवडणुक २०२४ हि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता भयमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त, नाशिक शहर यांनी परिसरातुन गुप्त माहिती काढुन कारवाई करणेचे सर्व पोलिस ठाण्यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने (दि.१६मे) रोजी हरसुल पोलिस ठाणे, नाशिक ग्रामीण यांचेकडुन मिळालेल्या माहितीनुसार एक ग्रे रंगाच्या टोयोटो इनोव्हा कार क्र.एमएच-२०-सीए-९५९५ मध्ये काही इसम बसुन नाशिकच्या दिशेने येत असुन त्यांचेकडे अग्निशस्त्र असल्याने नमुद इनोव्हा कार थांबवुन त्यांची चौकशी करण्यात यावी असे कळविलेवरुन गंगापुर पोलिस ठाणे गुन्हे शोध पथकातील पोहवा रविंद्र मोहिते, पोअं. रमेश गोसावी, पोअं. मच्छिंद्र वाकचौरे, पोअं विजय विष्णु नवले असे शासकीय वाहनाने गंगापुर जकात नाक्याचे पुढे रस्त्याचे कडेला जाऊन थांबले असता २०:३० वाजेच्या सुमारास गिरणारे गावाकडुन नाशिककडे ग्रे रंगाची टोयोटो इनोव्हा कार क्र.एमएच-२०-सीए-९५९५ हि येताना दिसली. त्यावेळी पोलिस स्टाफ यांनी नमुद वाहनास थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालक याने सदरचे वाहन न थांबविता पळुन जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा शासकीय वाहनाने सदरच्या वाहनाचा पाठलाग करुन त्या वाहनास एस.एस.टी. पॉईंट, गंगापुर गांव जकात नाक्याजवळ शासकीय वाहन आडवे लावुन ते थांबविले.



त्यावेळी नमुद वाहनात बसलेले इसमांनी पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिस स्टाफ यांनी त्यांना पकडुन ताब्यात घेतले. त्यावेळी त्या ठिकाणी हरसुल पोलिस ठाणेकडील स्टाफ त्या ठिकाणी आला. त्यावेळी त्यांची अंगझडती व इनोव्हा कारची झडती घेतली असता नमुद इनोव्हा कारचे मध्यभागी असलेल्या सिटच्या खाली एक स्टिलचे गावठी बनावटीचे अग्निशस्त्र व एक खाली पुंगळी मिळुन आली नमुद आरोपीतांना ताब्यात घेवुन गंगापुर पोलिस ठाणे येथे विचारपुस करुन त्यांचेविरुध्द गंगापुर पो.स्टे.गुरनं. ११९/२०२४ भा.ह.का.क.३/२५ सह मपोकाक. १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन नमुद गुन्हयात १) इम्रान अयनुर शेख (वय-२५ वर्षे), रा.गणेश चौक, संगीवनगर, अंबड लिंकरोड, सातपुर नाशिक, २) शेखर दिलीपराव कथले (वय-२९ वर्षे) रा.शिवानीनगर, ता.सेलु, नि.परभणी, ३) अरबाझ शब्बीर खान पठाण (वय-२३) रा.डिग्रसवाडी, सेलु नि.परभणी व ४) राहुल शाम क्षत्रिय (वय-२४ वर्षे) रा.साई बाबा मंदीराचे बाजुला, संत नगार्दन नगर, नांदुरमाका, नाशिक यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली असुन गुन्हयाचा पुढील तपास सहा.पोलिस उप निरीक्षक गणेश पाटील हे करीत आहेत.

सदर गुन्हयाचे तपासात अधिक माहिती घेतली असता नमुद आरोपीत मजकुर यांनी हॉटेल कश्यपी फोर्ट येथे किरकोळ कारणावरून वाद करुन तेथील हॉटेल मालक व वेटर यांना नमुद जप्त अग्निशस्त्राचा धाक दाखवुन दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने एकुण ०७ राउंड हवेत गोळीबार केलेले होते. त्यामुळे हरसुल पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण येथे नमुद आरोपीविरुध्द हरसुल पो. ठाणे गुरनं. ११२/२०२४ भादविक. ३०७,३२३,५०४, ५०६, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२७ सह अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनियम कलम ३(१) (आर) (एस), ४ (आय) (एस) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

अशा प्रकारे सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ १, किरणकुमार चव्हाण,सह पोलिस  आयुक्त, सरकारवाडा विभाग सिध्देश्वर धुमाळ, यांचे मार्गदर्शनाखाली गंगापुर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलिस उप निरीक्षक मोतीलाल पाटील, पोहवा.रविंद्र मोहिते, गणेश रहेरे, सचिन काळे, सचिन अहिरे, नापोशि.विनायक आव्हाड, पोशि मच्छिंद्र वाकचौरे, सुजित जाधव, रमेश गोसावी, सतीश जाधव महिला पोलिस शिपाई अश्विनी खांदवे सर्व नेमणुक गंगापुर पोलिस स्टेशन यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!