
पंचवटी पोलिसांची उल्लेखनिय कामगिरीःतीन घरफोडीच्या गुन्ह्याची मुद्देमालासह केली उकल…
पंचवटी पोलिसांनी रेकॅार्हडवरील गुन्हेगार यांना ताब्यात घेऊन हद्दीतील ३ घरफोडीची केली उकल उकल करून ७ तोळे सोने व २ मोबाईल असा एकुण २,८४,००० रूपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त….
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात मागील कालावधीत दाखल घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन मालाविरूद्धचे गुन्हयांना प्रतिबंध करणेबाबत पोलिस आयुक्त.संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त परीमंडळ १ किरणकुमार चव्हाण, नाशिक शहर यांनी मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने पंचवटी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रभारी अधिकारी, सपोनि विलास पडोळकर व अंमलदार यांनी पंचवटी पोलिस ठाणेचे अभिलेखावरील मालमत्ते विरूध्दचे गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने योजना आखुन सदर गुन्हयांचा मानवी कौशल्याने व तांत्रिक पध्दतीने तपास करत असतांना दि.(१३) रोजी नापोशि संदीप मालसाने यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर घरफोडी संबंधीत पुणे आणि नाशिक येथील रेकॅार्डवरील गुन्हेगार व यातील संशईत इसम अस्लम अतिफ शेख, हा निमाणी बस स्टॅण्ड येथे आल्याबाबत माहिती मिळाल्याने गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी निमाणी बस स्टॅण्ड येथे जाऊन सापळा रचुन संशयीत अस्लम अतिफ शेख, यास ताब्यात घेतले


त्याचेकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता, त्याने व त्याचा साथीदार पोपट शंकर कणिंगध्वज अशांनी चालु वर्षी पंचवटी पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात घरफोडीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावरून पंचवटी पोलिस ठाणे येथील गुरनं. १५९ / २०२३४ भा.द.वि.क. – ३८०, ४५४ प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आणुन त्यास अटक करुन दोन्ही आरोपींकडे केलेल्या तपासा दरम्यान सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या किमंती मुद्देमाल, तसेच गु.र.नं. २२९ / २०२४ भादविक ३८०,४५४ व गु.र.नं. १५६/२०२४ भादविक ३८०, ४५४ मधील मुद्देमाला पैकी ७ तोळे सोने व २ मोबाईल फोन असा एकुण २,८४,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास पोहवा दिपक नाईक हे करीत आहेत. वरील नमुद प्रमाणे पंचवटी पोलिस ठाणे येथील गुन्हे शोध पथकास एकुण ०३ गुन्हयांची उकल करण्यात यश प्राप्त झाले आहे

अशा प्रकारे सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त.संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त परीमंडळ १ किरणकुमार चव्हाण,सहा.पोलिस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव, पंचवटी विभाग, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक,पोलिस स्टेशन पंचवटी मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलिस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे सपोनि विलास पडोळकर, पोहवा सागर कुलकर्णी,दिपक नाईक,अनिल गुंबाडे, महेश नांदुर्डीकर, नापोशि कैलास शिंदे, संदीप मालसाने, जयवंत लोणारे, निलेश भोईर,राकेश शिंदे, पोशि गोरक्ष साबळे, घनश्याम महाले, कुणाल पचलोरे, नितीन पवार, अंकुश काळे, वैभव परदेशी, युवराज गायकवाड, मपोशि रोहिणी भोईर यांनी पार पाडली आहे.



