नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने शिताफिने उघड केले २ वेगवेगळे चोरीचे गुन्हे…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ संशईत ईसमांना ताब्यात घेऊन मोटार सायकल व लॅपटॉप, मोबाईल चोरी करणाऱ्यांना जेरबंद करुन उघड केले २ वेगवेगळे गुन्हे….

नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,नाशिक शहरात मोटार सायकल, लॅपटॉप व इतर चोरी करणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबत पोलिस आयुक्त  संदीप कर्णीक यांनी सुचना दिल्या होत्या,त्यानुसार पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव,सहा. पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते.
त्याअनुषंगाने दि (२३) रोजी गुन्हेशाखा युनिट १ चे पो. हवा. विशाल काठे यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली  पथकातील पोउनि रविंद्र बागुल, पो. हवा.विशाल काठे, नाझीम पठाण, प्रदिप म्हसदे, शरद सोनवणे यांनी शितळादेवी मंदिरा समोर
सापळा लावुन संशईत इसम १) सौरभ शिवाजी बनकर, रा. समतानगर, आगर टाकळी, नाशिक २) अजय कुंडलीक बोराडे
रा. गुरुप्रसाद सोसायटी एन के नगर नाशिक यांना शिताफीने पकडुन त्यांना ताब्यात घेवुन विचारपुस करता त्यांनी मोटार
सायकल चोरी केल्याचा गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच त्यांचे कडुन ५०,०००/- रु. कि. ची हिरोहोंडा कंपनीची पॅशन प्रो
मोटार सायकल क्रमांक एम एच १५ डी एफ ४३२९ ही हस्तगत करण्यात आली आहे. सदरच्या मोटार सायकल चोरी प्रकरणी उपनगर पोलिस ठाणे गु.र.नं. १८३/२०२४ भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे.





तसेच गुन्हेशाखा युनिट  १ चे नापोशि प्रशांत मरकड त्यांना गुप्त बातमी दारा मार्फत मिळालेल्या बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली पो. हवा.  प्रविण वाघमारे, संदिप भांड, धनंजय शिन्दे, प्रशांत मरकड, अमोल कोष्टी, राम बर्डे, अशांचे पथकाने आसाराम पुला जवळील विश्वास टर्फ च्या बाजुला संशयीत  इसम १) अदित्य प्रकाश देवरे रा. राधे संकुल सोसायटी, व्दारका, नाशिक २) उर्जीत कुदन कुलकर्णी, रा. राणे
नगर, नाशिक अशांना शिताफीने पकडुन ताब्यात घेवुन त्यांना विचारपुस करता त्यांनी लॅपटॉप व मोबाईल फोन चोरी  केल्याचा गुन्हा केल्याची कबुली देवुन त्यांचे कडुन ५५,५००/- रु. किंमतीचे एच पी कंपनीचा लॅपटॉप व अॅपल कंपनीचा मॉडल ११ अॅपल मोबाईल फोन असे हस्तगत करण्यात आले आहे. सदरच्या चोरी प्रकरणी गंगापुर पोलीस ठाणे गु.र.नं. १२० / २०२४ भा.द.वि कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे



सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलीस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त(गुन्हे) डॉ. सिताराम कोल्हे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सपोनि  हेमंत तोडकर, पोउनि रविंद्र बागुल पो.हवा. विशाल काठे, प्रविण वाघमारे, शरद सोनवणे,
प्रदिप म्हसदे, नाझीम पठाण, संदिप भांड, धनंजय शिंदे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी,चासफौ  किरण शिरसाठ अशांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!