नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट २ ने अंबड हद्दीतील मोटारसायकल चोरीचा गुन्हा ६ तासाचे आत केला उघड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गुन्हे शाखा युनीट २ ने मोटारसायकल चोरीच्या गुन्हयातील आरोपींना मुद्देमालासह ६ तासाचे आत ताब्यात घेवून गुन्हा केला उघड….

नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी शहरातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत नाशिक शहर गुन्हे शाखा पोलिस उप आयुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ. सिताराम कोल्हे यांना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने पोलिस उपायुक्त गुन्हे यांमी  शहरातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत गुन्हेशाखा युनिट – २ ला मार्गदर्शन करून आदेश दिले होते.
त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-२ येथील पोहवा विशाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की,काही इसम नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथील वासन नगर म.न.पा. गार्डन येथे चोरीची मोटार
सायकल विक्री करीता येणार आहेत. त्यानुसार सदरची बातमी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना सांगीतली असता त्यांनी पोलिस उप निरीक्षक अजय पगारे, पोहवा विशाल पाटील, गुलाब सोनार, चंद्रकांत गवळी, शंकर काळे, वाल्मीक चव्हाण, नापोशि नितीन फुलमाळी, पोशि संजय पोटींदे अशांना सदर बातमीची खात्री करणे बाबत आदेश दिले.





त्यानुसार खात्री केली असता वासन नगर म.न.पा. गार्डन च्या बाहेर दोन इसम स्प्लेंडर प्रो मोटार सायकल विक्री करता आलेले दिसले त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव पत्ता
विचारले असता १) सखाराम ज्ञानेश्वर म्हस्के, वय २८ वर्षे, रा. पाथर्डीफाटा २) दत्ता गणपत नखाते, वय ३४ वर्षे, रा. इंदिरा नगर, नाशिक असे समजून आले. त्यांचे ताब्यात मिळून आलेल्या मोटार
सायकलची खात्री केली असता सदरची मोटार सायकल त्यांनी शुभम पार्क सिडको, नाशिक परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली. लगेच अंबड पोलिस स्टेशनला आज दि (२४) रोजी गु.र.नं. ३४६ / २०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असल्याने त्यांना पुढील कारवाईसाठी अंबड पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.



सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उपायुक्त(गुन्हे)प्रशांत बच्छाव,सहा पोलिस आयुक्त डॅा सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट २ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली  युनिट. २ येथील पोहवा  विशाल पाटील, शंकर काळे, गुलाब सोनार, चंद्रकांत
गवळी, वाल्मीक चव्हाण, नापोशि  नितीन फुलमाळी, पोशि संजय पोटींदे यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!