
अवैधरित्या विक्रीकरीता गोमांस वाहतुक करणार्यास युनीट २ ने घेतले ताब्यात…
गोवंशीय जनावरांच्या मांसाची विक्री करीता वाहतुक करणारार्यास गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात….
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव,सहा पोलिस आयुक्त (गुन्हे ) संदिप मिटके यांनी अवैधरित्या गोमांस वाहतुक / विक्री करणाऱ्या इसमांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत सक्त सुचना दिल्या होत्या.


त्या अनुषंगाने दि.(५) रोजी युनिट २ मधील पोलिस अंमलदार तेजस मते यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इंदिरानगर पोलिस स्टेशन हददीत, वडाळागांव, नाशिक येथे सेंट सादीक स्कुलकडे जाणाऱ्या रोडवर एक इसम हा गोवंश जनावरांची कत्तल करून त्याचे मांस विक्री करण्याकरीता टेम्पो क्रमांक. एम. एच ४१ एयु ४०४९ ह्यात घेवुन येणार असले बाबत माहीती मिळाल्याने त्या खात्री करुन सदरची बातमी ही पोनि विदयासागर श्रीमनवार यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा लावला असता एक इसम हा त्याचे ताब्यातील टॅम्पो नाशिक स्टिल ट्रेडर्स जवळ, वडाळागांव, नाशिक येथे घेवुन जातांना दिसला
त्यावरून बातमीची खात्री झाल्याने त्यास हात देवुन थांबविण्याचा इशारा करून थांबविले असता व टेम्पो मधील इसम यांस त्याचे नांव गांव विचारले असता त्यांने त्याचे नांव अझहर सफदर खान, वय ३१ वर्ष, रा. सल्ली पॉईंट, राजवाडाजवळ, वडाळागांव, नाशिक असे सांगितले त्यांस ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातील टेम्पो मध्ये काय आहे बाबत विचारले असता त्याने गोवंश जनावरांचे मांस असल्याचे सांगितले त्यास गोवंश जनावरांचे मांस कोठुन आणले व कोणी घेवुन जायला सांगितले तसेच टेम्पो कोणाच्या मालकीचा
आहे या बाबत विचारले असता त्याने शोएब समद कुरेशी रा. वडाळागांव, नाशिक तसेच नाजीर, व बबलु कुरेशी पुर्ण नांव पत्ता माहीती नाही व अजीज कादीर कुरेशी यांनी मला टेम्पोत भरून विकण्यासाठी पाठविले असल्याचे सांगितले त्यास ताब्यात घेवुन सुमारे ७२५ कि.ग्रॅम. अंदाजे वजन असलेले मांस मिळाले तात्काळ पशुवैदयकीय अधिकारी यांना बोलावून मांस सॅम्पल साठी ताब्यात घेतले सदर चे मांस हे तो विक्री करण्याकरीता नेत असल्याचे निष्पन्न झाले त्यावर पंचनामा करून वाहनासह एकुन ६,४५,०००/- रू. किंमतीचा मुददेमाल ताब्यात घेवुन इसम अझहर सफदर खान याचे विरूध्द महा. प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे सुधारित कलम २०१५ चे कलम ५ क, ५ ड भादंवि कलम ४२९, १८८
प्रमाणे इंदिरानगर पोलिस ठाणे येथे पोलिस अंमलदार तेजस मते यांनी फिर्याद देवुन आरोपी यांस मुददेमालासह पोलिस ठाणे ईंदीरानगर येथे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव,सहा पोलिस आयुक्त (गुन्हे ) संदिप मिटके यांचे आदेशानुसार गुन्हे शाखा युनीट २ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली युनीट २ चे पोहवा संजय सानप, मनोहर शिंदे, परमेश्वर दराडे, पोशि विशाल कुंवर, समाधान वाजे, महेश खांडबहाले, तेजस मते, स्वप्निल जुंद्रे यांनी केलेली आहे.



