गुंतवणुकदारांच्या ठेवीचा अपहार करणाऱ्या दोन कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गुंतवणुकदारांच्या ठेवींचा अपहार केल्याने श्री साईनाथ लॅन्ड अॅन्ड डेव्हलपमेंट (इंडिया) प्रा.लि. कंपनी तसेच कारडा कन्स्ट्रक्शन कंपनी यांचे संचालकावर MPDA कायद्यान्वये गुन्हा दाखल….





नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, श्री साईनाथ लॅन्ड अॅन्ड डेव्हलपमेंट (इंडिया) प्रा.लि. कंपनी तसेच कारडा कन्स्ट्रक्शन कंपनी व त्याचे संचालक यांनी फ्लॅट, गाळा खरेदीचे व्यवहारामध्ये फसवणुक करुन तसेच गुंतवणुक दारांना त्यांचे गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवुन गुंतवणुकदारांनी गुंतविलेल्या रकमेवर ठरल्याप्रमाणे परतावा न दिल्याने तसेच गुंतवलेली रक्कम परत न केल्याने श्री साईनाथ लॅन्ड अॅन्ड डेव्हलपमेंट (इंडिया)प्रा.लि. कंपनी तसेच कारडा कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे नागरिकांचे १२,६७,४५, ६४५/- रु अपहार केलेला
आहे.



सदर बाबत तक्रारदारांची पोलिस स्टेशन उपनगर येथे तक्रार प्राप्त झाल्याने श्री साईनाथ लॅन्ड अॅन्ड डेव्हलपमेंट(इंडिया) प्रा.लि. कंपनी तसेच कारडा कन्स्ट्रक्शन या कंपनीचे संचालक यांचे विरोधात उपनगर पोलिस स्टेशन येथे गुरनं १२७ / २०२४ तसेच गुरनं १३९ / २०२४ भादवि कलम ४०६, ४०९, ४२० राष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबधाचे) संरक्षण अधिनियम कलम ३, ४ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.



तसेच नाशिकरोड पोलीस स्टेशन गुरनं २०५ / २०२४ तसेच गुरनं २०७/२०२४ भादवि कलम ४०६,४०९, ४२० प्रमाणे, देवळाली कॅम्प पोलिस स्टेशन गुरनं ५३ / २०२४ भादवि कलम ४०६, ४०९, ४२०
प्रमाणे असे एकुण ०५ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.सदर गुन्हयाचे संदर्भात पोलिस आयुक्त, संदिप कर्णिक तसेच पोलीस उपायुक्त, परि.०२,  मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तपासपथके तपास करीत आहेत.
नाशिक शहरातील नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, श्री साईनाथ लॅन्ड अॅन्ड डेव्हलपमेंट(इंडिया) प्रा. लि. कंपनी तसेच कारडा कन्स्ट्रक्शन कंपनी व त्याचे संचालक यांचेकडुन फसवणुक झालेल्या इसमांनी संबधीत पोलिस स्टेशन येथे संपर्क साधुन आपली तक्रार नोंदवावी.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!