
भुसावळ येथील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीस नाशिक शहर गुंडा विरोधी पथकाने नाशिक शहरात घातल्या बेड्या….
भुसावळ येथील दुहेरी हत्याकांडातील गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपीस नाशिक शहर गुंडा विरोधी पथकाने ०२ पिस्टल व ०५ काडतुस सह २४ तासाच्या आत ठोकल्या बेडया…..


नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२९)मे रोजी रात्री ०९ वा चे सुमारास भुसावळ शहरात जुना सातारा भागातल्या मरीमाता मंदीरासमोर कारमधुन जाणा-या संतोष बारसे व सुनिल राखुंडे यांच्यावर आरोपींनी बेछूट गोळीबार करुन त्यांना ठार केले यावरुन दि.(३०) मे रोजी भुसावळ शहर पोलिस स्टेशन येथे गुरन ११८ / २०२४ भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, १२० (ब), आर्म अॅक्ट ३ / २५, २७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे परंतु गुन्हा घडला तेव्हापासुन तो पोलिसांना कायम गुंगारा देत होता तरी पोलिसांना गोपनीय माहीती मिळाली की यातील आरोपी करण किसन पतरोड हा रेल्वे मार्गाने किंवा रस्त्याने मुंबईला पळुन जाण्याच्या तयारीत आहे

त्याअनुषंगाने जळगाव पोलिसांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचेशी संपर्क साधुन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश व सुचनेप्रमाणे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार आयुक्तालय हद्दीत नियमीत गस्त करुन गुन्हेगारांची माहिती काढुन कारवाई करीत असते.त्याच अनुषंगाने दिनांक ३०/०५/२०२४ रोजी भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीत गुंडा विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार गस्त करीत असतांना पोलिस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, भुसावळ शहर येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीकरण किसन पतरोड द्वारका परिसरात थांबलेला आहे.

त्यावरुन सदरची माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांना देवुन द्वारका येथे पथकासह सापळा लावुन बातमीप्रमाणे संशयीत इसम हा द्वारका येथील बोहरी पेट्रोलपंपाजवळ थांबलेला असल्याचे दिसुन आल्याने तो पोलिसांना पाहुन पळुन जाण्याच्या प्रयत्नात असतांना पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करुन शिताफीने त्यास ताब्यात घेतले असता आरोपी करण किसन पतरोड वय २० रा. ७२ खोली वाल्मीक नगर भुसावळ जि जळगाव याचेकडुन भुसावळ येथे संतोष बारसे व सुनिल राखुंडे यांच्यावर बेछुट गोळीबार करुन त्यांची हत्या केली त्यावेळी वापरलेली ०२ देशी पिस्टल व ०५ काडतुसे असे एकुण ८४४२०/- रु चा मुद्देमाल जप्त करुन आरोपीस पुढील तपासकामी भुसावळ शहर पोलिस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.
भुसावळ शहर येथील दुहेरी हत्याकांडातील गोळीबार करणारा मुख्य आरोपीस गुंडा विरोधी पथक, नाशिक शहर यांनी २४ तासाच्या आत शोध घेवुन त्याचेकडुन गुन्हयात वापरलेले ०२ देशी बनावटीचे पिस्टव व ०५ काडतुसे जप्त करुन गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणल्याने नाशिक शहर आयुक्तालय व जळगाव पोलिस दलाच्या वतीने गुंडा विरोधी पथकाचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उपायुक्त(गुन्हे) चंद्रकांत खांडवी,सहा पोलिस आयुक्त (गुन्हे), डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलिस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, डी. के. पवार,प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रविण चव्हाण, राजेश सावकार, सुनिल आडके, नितीन गौतम, गणेश नागरे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे.


