पाचपावली पोलिसांनी दोन विधिसंघर्षित बालकांसह एकास ताब्यात घेऊन उघड केले ३ घरफोडीचे गुन्हे….
पाचपावली पोलिसांनी संशईतास ताब्यात घेऊन उघड केले ३ घरफोडीचे गुन्हे,२ विधीसंघर्षित बालकांनाही घेतले ताब्यात…
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१५) सप्टेंबर २०२४ चे दुपार ते दि(१६) सप्टेबर २०२४ चे ११.४५ वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे पाचपावली हद्दीत, कुन्हाडकर पेठ, लष्करीबाग, झेंडा चौक येथे राहणारे फिर्यादी निलेश अरूण डोंगरे, वय ४३ वर्षे यांनी तक्रार दिली की ते वर नमुद कालावधीत आपले घराला कुलुप लावुन परीवारासह नातेवाईकाकडे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन, घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने व नगदी १,५०,०००/-रू. असा एकुण २,००,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलिस ठाणे पाचपावली येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५(अ) भा.न्या.सं.लअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात पाचपावली पोलीसांचे तपास पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून,सापळा रचुन संशईत आरोपी तुषार उर्फ भेंडी अनुप खोटे, वय २० वर्षे, रा. लष्करीबाग, पाचपावली, नागपुर यास निष्पन्न करुन ताब्यात घेतले व त्याची विचारपुस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा हा त्याचे दोन विधीसंघर्षग्रस्त बालक साथीदार यांचे सोबतीने केल्याची कबुली दिली. आरोपीस अधिक विचारपुस केली असता, त्याने वर नमुद गुन्ह्याव्यतिरिक्त पो. ठाणे पाचपावली हद्दीत घरफोडीचे ईतर ०२ गुन्हे असे एकुण ०३ गुन्ह्यांची कबुली दिली.
आरोपीचे ताब्यातुन सोन्या-चांदीचे दागिने व नगदी १०,०००/- रू. असा एकुण ७०,२००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीस अटक करून, दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल,अपर पोलिस आयुक्त(उत्तर विभाग)प्रमोद शेवाळे,पोलिस उपायुक्त(परी.३) महक स्वामी, सहा पोलिस आयुक्त(लकडगंज विभाग) श्वेता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पाचपावली पोलिस ठाणे चे वपोनि.. बाबुराव राऊत,पोलिस निरीक्षक(गुन्हे). हरीष काळसेकर, सपोनि. सोमवंशी, पोहवा. दिलीप पवार, प्रकाश पखान, वासुदेव जयपुरकर, नापोशि. अंकुश राठोड, पोशि. आशिष बावणकर व पद्माकर उके यांनी केली.