२४ तासाचे आत गुन्हे शाखा युनीट २ ने उघड केला दरोड्याचा गुन्हा…
नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट २ ने दरोड्यातील आरोपींना ताब्यात घेऊन दरोड्याचा गुन्हा २४ तासांचे आत केला उघड…
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलिस उप आयुक्त गुन्हे / विशा, प्रशांत बच्छाव,सहा. पोलिस आयुक्त गुन्हे संदिप मिटके यांनी नाशिकरोड पोलिस स्टेशन येथे दि.(२०)जुन रोजी दाखल असलेल्या गुन्हा रजि. नं. ३४२ / २०२४ भा.दं.वि. कलम ३९४,३४ या गुन्हयातील अज्ञात आरोपींचा त्वरीत शोध घेवून कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या
त्याअनुषंगाने दि.(२१) रोजी गुन्हे शाखा युनिट – २ येथील पोहवा प्रकाश भालेराव यांना गोपनीय माहिती मिळाली की, जेलरोडला कोठारी कन्या शाळे कडून बिटको पॉईन्ट कडे जाणारे रोडवर
एका बँक कलेक्शन करणा-या व्यक्तीला अडवून त्याचेवर हल्ला करून पैसे हिसकावून घेतलेले इसम हे सिन्नर फाटा नाशिकरोड येथे हॉटेल रायबा जवळ लाल रंगाची ज्युपीटर व काळया रंगाची होंडा डिओ गाडी घेवून येणार आहेत.
त्यांनी सदर बातमी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना सांगीतली असता त्यांनी तपास पथकाला सुचना व मार्गदर्शन देवून गुन्हे शाखा युनिट -२ येथील पथक नेमून रवाना केले असता, मिळालेल्या बातमी प्रमाणे सिन्नर फाटा नाशिकरोड येथे हॉटेल रायबा जवळ दोन दुचाकीवर ४ संशयीत ईसम आली त्यांना ताब्यात घेऊन त्यांना नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) विश्वास नितीन श्रीसुंदर, वय २५ वर्षे, रा. जलशुध्दीकरण केंद्र, नवीन कोर्ट नाशिकरोड चे बाजुला, नाशिकरोड, २) हारून निसार कुरेशी, वय २६ वर्षे, रा. लक्ष्मी अपार्टमेंट समोर, दसक, राजवाडयाजवळ, जेलरोड, नाशिकरोड ३) भारत देविदास चौधरी, वय २४ वर्षे, रा. एकलहरा रोड, मोगल मंजिल जवळ, मगर मळा, नाशिकरोड, ४) नासिर कमरूद्दीन शेख, वय २२ वर्षे, रा. गुलशन नगर डेपोजवळ, मालेगाव ता.मालेगाव जि. नाशिक असे ४ आरोपी मिळून आले त्यांना ताब्यात घेवून विचापुस केली असता, त्यांनी त्यांचा साथीदार हर्षद त्रिभुवन उर्फ कच्छी, रा. जलशुध्दीकरण केंद्र, नवीन नाशिक रोड कोर्टाचे बाजुला, नाशिक रोड याचेसह गुन्हा केल्याची प्राथमिक कबुली दिली असून ताब्यात घेण्यात आलेल्या ४ आरोपींच्या ताब्यातून दोन कोयते, दोन मोपेड / स्कुटर, ३ मोबाईल व दरोडयातील रक्कम ४५,५००/- रू. रोख असा एकुण १,८२,५००/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून दरोडयाचा गुन्हा २४ तासांचे उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलिस उप आयुक्त गुन्हे / विशा, प्रशांत बच्छाव,सहा. पोलिस आयुक्त गुन्हे संदिप मिटके,गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन जाधव, सफौ विलास गांगुर्डे, बाळु शेळके, राजेंद्र घुमरे, पोहवा प्रकाश भालेराव, पोहवा शंकर काळे, पोहवा सुनिल आहेर,अतुल पाटील, सोमनाथ जाधव, प्रकाश महाजन, पोहवा प्रकाश बोडके,पोहवा वाल्मीक चव्हाण, पोशि प्रविण वानखेडे यांनी केलेली आहे.