
फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीस युनीट १ ने अथक परीश्रम करुन घेतले ताब्यात….
पैसे तिनपट करण्याचे आमिष दाखवून बनावट नोटा देवून फसवणुक करणारा व दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट १ ने केले जेरबंद…
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पंचवटी पोलिस ठाणे येथे दाखल गुरनं ९५ / २०२२ भादवि कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दि. १२ / ०३ / २०२२ रोजी दाखल होता. सदर गुन्हयातील फिर्यादी यांना दि. ११/०३/२२ रोजी रात्री ०९:३० वाजता त्यांच्या ओळखीची महीला व तिचे साथिदार यांनी संगणमत करून फिर्यादी यांना हॉटेल चटक मटक समोर, गंगाघाट पंचवटी, नाशिक येथे ७ लाख रूपये घेवून या व फक्त दाखवा त्याचे २३ लाख रूपये करून देते असे आमिष दाखवून सदर ठिकाणी बोलावून घेतले होते. तेथे आरोपी महीला व तिचे साथीदार यांनी सोबत आणलेले बनावट नोटांचे बंडल दाखवून फिर्यादी यांचे कडील सात लाख रूपये घेवून करून पळून गेले होते त्यावरुन
पोलिस ठाणे पंचवटी येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता,गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी तेजस उर्फ बंटी सुरेश वाघ हा मिळून येत नव्हता तसेच वेळोवेळी आपले ठिकाण बदलत होता.


गुन्हयातील पाहिजे व फरार आरोपीतांचा शोध घेणेबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,यांनी सुचना दिलेल्या होत्या. तसेच पोलिस उपायुक्त गुन्हे .प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त गुन्हे, डॉ. सिताराम कोल्हे यांनी गुन्हेशाखा युनिट १ यांना मार्गदर्शन केले होते. गुन्हे शाखा युनिट १ चे पोलिस अधिकारी व अंमलदार पाहीजे व फरार आरोपींचा शोध घेत असतांना दोन वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी तेजस उर्फ बंटी सुरेश वाघ वय २५ रा. समर्थ हार्डवेअर दुकानासमोर, डांग सौंदाणे, ता. बागलाण, जि. नाशिक येथे असल्याबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना गुप्त
बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने त्यांनी पोउनि चेतन श्रीवंत, पोहवा महेश सांळूके,पोशि विलास चारोस्कर, नितीन जगताप, आप्पा पानवळ यांना सुचना देवुन त्यांचे पथक तयार करून
रवाना केले.

सदर पथकाने मिळालेल्या बातमीवरून तेजस उर्फ बंटी सुरेश वाघ वय २५ यास सापळा रचून त्यास पकडत असतांना त्यास पोलिसांची चाहुल लागल्याने तो पळून जात असतांना पोलिस पथकाने त्याचा पाठलाग करून त्यास पकडून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव तेजस उर्फ बंटी सुरेश वाघ वय २५ रा. समर्थ हार्डवेअर दुकानासमोर, डांग सौंदाणे, ता. बागलाण, जि. नाशिक असे सांगून त्यास ताब्यात घेतले व त्यास गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने गुन्हयाचे कबुली दिली आहे तेजस उर्फ बंटी सुरेश वाघ याच्या घरझडतीमध्ये फिर्यादी यांस फसवणूक करण्याकरीता वापरण्यात आलेल्या ५००, २००, १०० व ५० रू दराच्या बनावट १५७ नोटांचे बंडल हस्तगत करण्यात आले आहे. त्यास पुढील कारवाई कामी पंचवटी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलिस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव,सहा पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १
नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउपनि गजानन इंगळे,चेतन श्रीवंत,सफौ सुरेश माळोदे, पोहवा देविदास ठाकरे, नापोशि मिलींदसिंग परदेशी
पोहवा महेश साळूंखे, शरद सोनवणे, देविदास ठाकरे, धनंजय शिंदे, प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, योगीराज गायकवाड,नापोशि मिलींदसिंग परदेशी, पोशि विलास चारोस्कर, नितीन जगताप, आप्पा पानवळ, मुख्तार शेख, राम बर्डे, चासपोउनि किरण शिरसाठ यांनी केली



