वयोव्रुध्द जोडप्यावर धारदार शस्त्राने हल्ला करुन दरोडा टाकणारे युनीट १ ने केले जेरबंद…
प्राणघातक शस्त्राने मारहाण करून दरोडा टाकणारे इसम जेरबंद
गुन्हेशाखा युनिट क्र. १ ची कामगिरी….
नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दिनांक १६/०४/२०२४ रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास अनोळखी ४ ते ५ इसमांनी तपस्वी बंगला कॉलेज रोड या बंगल्यामध्ये घुसून धारदार चाकुने तेथील वयोवृध्द आजी व बाबा यांचेवर वार करून घरातील सोन्या चांदीचे दागिणे, रोख रक्कम, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, बँकेचे कागदपत्र, पासपोर्ट असे बळजबरीने हिसकावुन घेवुन पळुन गेले त्याबाबत गंगापुर पोलिस ठाणे येथे गुरनं ९१ / २०२४ भादवि कलम ४५२, ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने व सामान्य नागरीकांच्या मनात दहशत निर्माण करणारा असल्याने त्याचे तिव्र पडसाद शहरात उमटल्याने सदर गुन्हयातील आरोपींचा तात्काळ शोध घेणेबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस यांनी सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव,सहा.पोलिस आयुक्त,(गुन्हे) डॉ. सिताराम कोल्हे, यांनी नाशिक शहरामध्ये जबरी चोरी, दरोडा असे गुन्हे करणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.
त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे गुन्हेशाखा युनिट १ चे पोलिस पथके तयार करून तात्काळ घटनास्थळी भेट देवुन त्या भागातील सी.सी.टी.व्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाचा अभ्यास करून पोहवा नाझीमखान पठाण व पोशि आप्पा पानवळ यांना मिळालेल्या गुप्तबातमीद्वारे वर नमुद गुन्हयातील दोन संशयीत इसम हे स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक एम.एच १८ -ई-६०८९ हिच्यावर बसुन गाडगे महाराज पुलाच्या खाली पंचवटी नाशिक या ठिकाणी येणार आहे. अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी वपोनि मधुकर कड यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि हेमंत तोडकर, पोउनि चेतन श्रीवंत, पोहवा नाझीमखान पठाण, महेश साळुंके, रमेश कोळी,
नापोशि मिलींद परदेशी,पोशि आप्पा पानवळ, नितीन जगताप, विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे अशांनी गाडगे महाराज पुलाखाली पंचवटी, नाशिक येथे सापळा लावुन मोटार सायकल वरील दोन इसमांना शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. सदर इसम नामे १) संदिप भारत रणबावळे, मुळ रा-मु.पो करंजी गरड ता. रिसोड जि.वाशिंद, सध्या रा-श्रीराम एम्पायर बिल्डर नमन शहा यांच्या साईटवर कुलकर्णी गार्डन, शरणपुररोड नाशिक, २) महादेव बाबुराव खंदारे, रा-कॉलेजरोड डिसुजा कॉलेनी चाफेकर यांचे घरामध्ये, कॉलेजरोड नाशिक असे सांगुन त्यांना विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्याचे साथीदार अरूण उर्फ बबन गायकवाड, नंदकिशोर रणबावळे व एक विधीसंघर्षित बालक यांचेसह केल्याची कबुली दिली.
त्याचे ताब्यातुन मोटार सायकल क्रमांक MH 18 E 6089 दोन मोबाईल फोन व रोख रूपये ४७२०/- असा ७४,७२०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी संदिप रणबावले याचेकडे अधिक विचारपुस करता त्याने बिल्डर अजित प्रकाश पवार, रा-लक्ष्मीनगर कॉलेजरोड, नाशिक याने २ महिन्यापुर्वी कॉलेजरोड येथील तपस्वी बंगला येथे जावुन तेथे राहणा-यांकडुन घर खाली करून दिल्यास ८ ते १० टक्के कमिशन देईन अशी सुपारी दिल्याने वरील आरोपींनी सदर ठिकाणी तेथे राहणारे वयोवृध्द आजी व बाबा यांना धमकी देवुन, त्यांना प्राणघातक शस्त्राने मारहाण करून घरातील सोन्या चांदीचे दागिणे, रोख रक्कम, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, बँकेचे कागदपत्र, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदार कार्ड वगैरे असे बळजबरीने हिसकावुन घेवुन पळुन गेलो असल्याची कबुली देवुन त्यापैकी मोबाईल फोन व कागदपत्रे असा ४०,०००/- किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. वरील आरोपीतांकडुन एकुण १,१४,७२०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वरील आरोपींना पुढील
कार्यवाही कामी गंगापुर पोलिस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव,सहा.पोलिस आयुक्त,गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट. १ नाशिक शहर कडील पोलिस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि चेतन श्रीवंत, पोहवा नाझीमखान पठाण, रमेश कोळी, महेश साळुंके, शरद सोनवणे, धनंजय शिंदे, नापोशि मिलींद परदेशी, प्रशांत मरकड,पोशि आप्पा पानवळ, नितीन जगताप, विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे,चासफौ किरण शिरसाठ,
पोशि समाधान पवार व सफौ वसंत पांडव, सुरेश माळोदे, सुगन साबरे, पोहवा राजेंद्र लोखंडे अशांनी केलेली आहे.