
विदेशी दारुची तस्करी करुन गुजरातला जाणारे गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात…
नाशिक शहरातुन बडोदा(गुजरात)येथे जाणारा विदेशी दारुचा साठा गुन्हे शाखा युनीट २ ने घेतला ताब्यात,आयचर वाहनासह दोघांना घेतले ताब्यात….
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव ,सहा.पोलिस आयुक्त( गुन्हे), डॉ. सिताराम कोल्हे यांनी अवैधरित्या
दारूची वाहतुक व विक्री करणा-या इसमांवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने विशेष मोहिम सुरू करण्यात आली होती त्यानुसार गुन्हेशाखा, युनिट क्र. २ नाशिक शहर मधील वरीष्ठ पोलिस निरीक्षक व्हि.डी. श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. २ ने दारुबंदी असलेल्या गुजरात राज्यात विदेशी दारुची तस्करी करणाऱ्यांचा पर्दाफाश केलाय


गुन्हे शाखेने दिलेल्या माहीतीनुसार दि. ३१/०३/२०२४ रोजी गुन्हे शाखेतील पोहवा. शंकर काळे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार एक आयशर ट्रक क्र. GJ-06AT-6473 हीचेतुन विनापरवाना, बेकायदेशीररित्या विदेशी दारू नाशिक येथुन गुजरात बडोदा येथे घेवुन जाणार असल्याची माहिती मिळाल्याने सदरची माहीती वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विद्यासागर श्रीमनवार यांना कळविली असता त्यांचे सुचनेप्रमाणे मिळालेल्या माहीतीनुसार नाशिकरोड, जेलरोड वरील, भिमनगर येथे सापळा रचुन सदर आयशर ट्रक थांबवुन आयशर ट्रकमधील दोन इसमांची चौकशी व ट्रकमधील विदेशी दारूबददल विचारपुस केली असता त्यांनी नावे १) सुनिल नटवर राणा वय – ४५ वर्षे. रा. मिनाक्षी डेअरीजवळ पादरा ता. पादरा, जि. बडोदा, गुजरात २) चंद्रेश भिकाभाई पटेल वय-३२ रा. चिप्पाड तलाव झोपडपटटी, पादरा ता. पादरा, जि. बडोदा,गुजरात असे सांगुन सदर विदेशी दारू व बियर ही गुजरात राज्यात बडोदा येथे विकीकरीता घेवुन जात असल्याचे सांगितले
सदर दोन्ही इसमांना आयशर ट्रकसह ताब्यात घेवुन त्यांचे कब्जातुन विदेशी दारू व बियर असा एकुण १,७७,३६०/- रू किं मुददेमाल, तसेच ७,००,०००/- रू किं.चा आयशर ट्रक क्र. GJ-06AT- 6473 असा एकुण ८,७७, ३६०/-रू किं चा मुददेमाल ताब्यात घेवुन पुढील कारवाईकामी नाशिकरोड पोलिस ठाणे याचेकडे पुढील तपासकामी देण्यात आला
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव ,सहा.पोलिस आयुक्त( गुन्हे), डॉ. सिताराम कोल्हे,गुन्हे शाखा युनीट २ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्रं. २ कडील सपोनि सचिन जाधव, पोहवा शंकर काळे, विलास गांगुर्डे, गुलाब
सोनार, संजय सानप, नंदकुमार नांदुर्डीकर, सुनिल आहेर, चंद्रकांत गवळी, विशाल पाटील, परमेश्वर दराडे, संजय पोटिंदे, चालक पो. हवा. मधुकर साबळे यांनी केलेली आहे.



