विक्रीकरीता प्रतिबंधित गुटखा व पानमसाला बाळगणारा युनीट २ च्या ताब्यात…
मानवी आरोग्यास घातक प्रतिबंधित पान मसाला व सुगंधीत तंबाखु विक्री करीता जवळ बाळगणारा इसम गुन्हे शाखा युनीट २ चे ताब्यात….
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी शहरातील तरूण पिढी व्यसनापासुन मुक्त होणेकरीता तंबाखुजन्य गुटखा चोरटी आयात व
साठवणुक करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करणे बाबत सुचना पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव,सहा पोलिस आयुक्त
(गुन्हे) संदिप मिटके यांना केल्या होत्या.
त्या अनुषंगाने दि. २३/०६/२०२४ रोजी पोहवा वाल्मीक चव्हाण यांना गोपनिय माहीती मिळाली की, एक इसम हा त्याचे ताब्यात प्रतिबंधीत पानमसाला व सुगंधीत तंबाखु विक्री करीता येणार आहे त्यानुसार सदरची बातमीची खात्री करून कारवाई करणे बाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक विदयासागर श्रीमनवार यांनी आदेशीत केल्याने त्यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक शहरातील मदिना चौकातील मातृछापा अपार्टमेंट जवळ सापळा रचुन मोहम्मद माजीद सुफीयान खान, वय २० वर्ष, रा. फ्लॅट नं ०५, मातृछाया अपार्टमेंट, मदिना चौक, सारडा सर्कल,नाशिक. मुळ रा. मु. पो. मदारपुर ता. मेहनगर, जि. आझमगढ (उत्तरप्रदेश) यास पकडले असता त्याचेकडे विमल पानमसाला, राज निवास सुंगधीत पान मसाला तसेच तंबाकुचे पाकीटे मिळुन आले अधिक विचारपुस करून त्याचे घराची घरझडती घेतली असता त्याचे घरात महाराष्ट्र राज्यात विक्री, वाहतुक तथा साठवणुक इत्यादीसाठी प्रतिबंधीत केलेला १,३९,५१६ रू किंमतीचा पान मसाला व सुगंधीत तंबाखु मुद्देमाल मिळुन आल्याने त्याचे विरुध्द मुंबईनाका पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव,सहा पोलिस आयुक्त(गुन्हे) संदिप मिटके यांचे आदेशानुसार गुन्हे शाखा युनीट २ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ येथील श्रेणी. पोउनि अजय पगारे, सफौ राजेंद्र घुमरे, पोहवा गुलाब सोनार, संजय सानप, चंद्रकांत गवळी, वाल्मीक चव्हाण, प्रकाश महाजन, सुनिल आहेर, अतुल पाटील, पोशि प्रविण वानखेडे यांनी केली