
वयोव्रुध्द महीलेचे चोरीस गेलेले दागिणे आरोपीस अटक करुन महीलेस केले परत…
उपनगर पोलीसांनी आरोपींना अटक करून वयोवृध्द महिलेचे चोरी झालेले 22 तोळे सोने केले हस्तगत…


नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राउत,सहा. पोलिस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉ. सचिन बारी यांनी नाशिक शहरातील घरफोडी करणारे आरोपींचा शोध
घेवून गुन्हे उघडकीस आणणे बाबत वारंवार सुचना देवून मार्गदर्शन केले होते त्याअनुषंगाने
दिनांक 06/02/2024 रोजी फिर्यादी श्रीमती सुहासिनी विष्णु साने, वय- 81 वर्षे, रा. जगताप मळा, तरणतलाव रोड, नाशिकरोड नाशिक या घरातुन बाहेर गेलेले असतांना अज्ञात इसमाने कशाच्या तरी सहाय्याने घरात प्रवेश करून घरातील एकूण सुमारे 22 तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहे अशी तकार प्राप्त झाल्याने पोलिस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राउत व सहा. पोलिस आयुक्त, नाशिकरोड विभाग डॉ. सचिन बारी यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देवून नाशिक रोड विभागाचे सपोआ डॉ. सचिन बारी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिस ठाण्याचे वपोनि जितेंद्र सपकाळे यांना आरोपींचा शोध घेवून अटक करण्याचे आदेश दिले होते

त्यावरुन उपनगर पोलिस ठाण्याचे वपोनि जितेंद्र सपकाळे यांनी
उपनगर पोलिस ठाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सपोनि सचिन चौधरी व पथक यांना आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस
आणणेबाबत आदेश केले. त्यानुसार पो.शि. जयंत शिंदे यांनी सीसीटीव्ही कॅमेरांचे मदतीने मिळवलेल्या माहितीच्या आधारे
तसेच सपोनि चौधरी व पो.शि. गौरव गवळी यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींचा शोध घेवून आरोपी दत्तु
साहेबराव पाटिल, वय 50 वर्षे, रा. ठि. टाकळी गाव, प्र.चा. पोस्ट ओझर, ता.चाळीसगाव, जि. जळगाव याला पाचोरा जि. जळगाव येथून अटक केले. आरोपीला अटक करून सपोनि सचिन चौधरी, पोहवा विनोद लखन, इम्मन शेख,अनिल शिंदे, पोशि सुरज गवळी, संदेश रघतवान,पंकज कर्पे अशा पथकाने त्याचा साथीदार 2) रामचंद्र कृष्णा पाटील वय 62 वर्षे, रा. सीतागुफा रोड, एसबीआय बँकेच्या एटीम समोर, पंचवटी नाशिक याला पंचवटी येथून अटक करण्यात आली व सदर गुन्हयात चोरी केलेले एकूण 22 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राउत व नाशिक रोड विभागाचे सपोआ डॉ सचिन बारी, यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिस ठाण्याचे वपोनि जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे सपोनि सचिन चौधरी, पोउपनि सुरेश गवळी, पोहवा विनोद लखन, इमान शेख, पोशि. जयंत शिंदे, गौरव गवळी, अनिल शिंदे, सुरज गवळी, संदेश
रघतवान, पंकज कर्पे,मिलींद बागुल,सुनिल गायकवाड यांनी तांत्रिक विश्लेषण विभागाचे मपोउपनि नेहा सुर्यवंशी, पोशि गणेश रूमाले नाशिक शहर यांची मदत घेवुन गुन्हा उघडकीस आणुन आरोपींकडुन चोरी केलेले दागिने हस्तगत केलेले असून सदर गुन्हयाचा तपास सपोनि सचिन चौधरी करत आहेत.


