
जिवे मारण्याचा प्रयत्न करुन पळुन गेलेले आरोपींना अंबड पोलिसांनी १० तासाचे आत घेतले ताब्यात…
खुन करण्याचा प्रयत्न करून पळुन गेलेल्या ०६ आरोपींना अंबड पोलिसांनी १० तासाचे आत घेतले ताब्यात…


अंबड(नाशिक शहर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दिनांक ०७/०४/२०२४ रोजी रात्री १०.०० वा चे सुमारास किरकोळ वादाचे कारणावरून सराईत आरोपी दर्शन उत्तम दोंदे हा त्याचे इतर साथीदारासह मोटार सायकलवर येवुन अभ्युदय बॅकेजवळ, पवननगर, सिडको, अंबड, नाशिक येथे इसम नामे वैभव गजानन शिर्के उर्फ गिल्या यांच्याशी वाद घालुन त्यांच्या जवळील अग्नीशस्त्राने फायर करून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्या बाबत अंबड पोलिस ठाणे नाशिक शहर येथे गुरन २३३ / २०२४ भादवि कलम ३०७, १४३, १४४, १४७, १४८, १४९, सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५,५(अ), २७, ४/२५, सह की. लॉ. अ. अॅक्ट कलम ७, सह मपोकाक १३५ प्रमाणे दर्शन दोंदे, गणेश
खांदवे, राकेश गरूड, अक्षय गवांजे, खग्या उर्फ अथर्व राजधिरे, बट उर्फ अजय राऊत, छोटया काळया उर्फ जितेंद्र चौधरी व इतर २ ते ०३ आरोपींता विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता

सदरचे आरोपी हे गुन्हा करून पळुन गेल्याने सदर गुन्हयाचा तपास पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त परिमंडळ – ०२ मोनिका राऊत, सहा.पोलिस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबड पोलिस ठाणे, दिलीप ठाकुर,पोनि. प्रशासन दिनेश शेंडे हे करीत होते. सदर गुन्हयातील आरोपी हे गुन्हा करून पळुन गेले होते. सदर
आरोपीतांचा शोध घेणेकरीता एकुण ०२ पोलिस पथके तयार करून त्यांना विविध ठिकाणी पाठविण्यात आले होते. सदर आरोपींचा सपोनि किरण रोंदळे व त्याचे बरोबर असलेल्या अंमलदारांनी सदर गुन्हयातील आरोपींचा माग काढुन आरोपींना गुन्हा घडल्यापासुन १० तासांचे आत गुन्हयातील आरोपी नामे १) दर्शन उत्तम दोंदे,२) गणेश दत्तात्रय खांदवे, ३) राकेश कडु गरूड, ४) अथर्व राजधिरे उर्फ खग्या, ५) बट उर्फ अजय रमेश राऊत, ६)जितेंद्र अशोक चौधरी उर्फ छोटया काळया यांना मानवी कौशल्य व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे नाशिक शहरातील विविध भागातुन सपोनि किरण रोंदळे व अंबड पोलिस ठाणे कडील गुन्हे शोध पथकातील नापोशि परदेशी, गायकवाड, पोशि करंजे, प्रविण राठोड, शिंदे, अनिल गाढवे,राकेश राउत, संदिप भुरे मते यांनी आरोपी ताब्यात घेवुन सदरची कार्यवाही केली आहे. सदरच्या आरोपीतांना मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना दिनांक १२/०४/२०२४ रोजी पावेतो पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
सदरची कामगीरी ही पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलिस उपायुक्त परिमंडळ -०२ मोनिका राऊत,सहा. पोलिस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबड पोलिस ठाणे, दिलीप ठाकुर, पोनि प्रशासन दिनेश शेंडे यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सपोनि किरण रोंदळे व अंबड पोलिस ठाणे कडील गुन्हे शोध पथकातील नापोशी परदेशी, गायकवाड, पोशि करंजे,प्रविणराठोड,शिंदे,अनिल गाढवे,राकेश राउत,संदिप भुरे, मते सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि. प्रशासन दिनेश शेंडे व पोशि सोळुंखे करीत आहेत.



