
सराईत गुन्हेगार प्रतिक यास MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द…
अंबड पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी सराईत गुन्हेगारावर एम पी डी ए अंतर्गत कडक कारवाई…
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त ,संदिप कर्णिक नाशिक शहर ,पोलीस उप आयुक्त परि. – २ मोनिका राउत सहायक पोलिस आयुक्त, अंबड विभाग शेखर देशमुख यांनी सराईत गुन्हेगारांवर ” महाराष्ट्र झोपडपटदीदादा, हातभटट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणा-या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स) वाळु तस्कर व अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणा-या व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम सन १९८१ चे कलम ३ (१) अनुसार” स्थानबध्दतेची कारवाई त्यांचेवर करणे बाबत अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकुर यांना सुचना व मार्गदर्शन केले होते.



अंबड पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाईचे करण्याचे धोरण केले असुन त्याचा गुन्हेगारी वर परिणाम झालेला दिसुन येत आहे. प्रशिक अशोक अडांगळे यास पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, नाशिक शहर यांनी स्थानबध्द करण्याचे आदेश जारी करून अंबड पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलिप ठाकुर यांना त्याचा शोध घेवुन त्यास स्थानबध्द करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे पोलिस उप निरीक्षक,न्ईद शेख, नापोशि परदेशी, पोशि प्रविण राठोड, अनिल गाढवे, शिंदे, मते, संदिप भुरे यांनी इसम नामे ‘ प्रशिक अशोक अडांगळे वय-२६, रा- रूम नं ४ जोगेश्वरी अर्पाटमेंट, अभियंतानगर, कामटवाडा, सिडको, नाशिक यास गोपनिय बातमीचे आधारे त्याचे राहते घरातुन ताब्यात घेण्यात आले. त्यास दिनांक १४/०२/२०२४ रोजी पासुन नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबध्द करण्यात आले आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यातच सराईत गुन्हेगारांवर एम पी डी ए अंतर्गत कारवाई करण्यात आली असुन अंबड पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे धोरण हाती घेतल्याने अंबड पोलीसांच्या या उत्कृष्ठ कामगिरी बदद्ल नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उप आयुक्त मोनिका राउत, परिमंडळ-०२, सहा पोलिस आयुक्त शेखर देशमुख, अंबड विभाग तसेच अंबड पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकुर व क्राईम पोलिस निरीक्षक अशोक नजन यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोउनि नाईद शेख,नापोशि पवन परदेशी, पोशि राउत,करंजे, समाधान शिंदे, संदिप भुरे, अनिल गाढवे, सागर जाधव, घनश्याम भोये,तुषार मते,राठोड, राकेश पाटील, निकम यांनी केली असुन यापुढे देखील सराईत गुन्हेगारांवर एम पी डी ए अंतर्गत करण्यात येईल याची माहिती अंबड पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर यांनी दिली.


