
माजी सैनिकास कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्यास गुंडा विरोधी पथकाने गोव्यातुन घातल्या बेड्या…
माजी सैनिकासह त्यांच्या साथीदारांना कोटयावधीचा गंडा घालणाऱ्या कर्नाटकातील आरोपीस गुंडा विरोधी पथकाने गोव्यातून केली अटक….
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,मार्च २०२० ते ऑगस्ट २०२० चे दरम्यान आरोपी युवराज बाळकृष्ण पाटील रा.बेलगाव राज्य कर्नाटक याने शेअर मार्केट मधील त्यांचे अॅक्युमेन व गुडविल या शेअर मार्केट कंपनीचे प्रमाणपत्र दाखवुन ते त्यामधील ब्रोकर असल्याचे सांगुन गॅरन्टेड रिटर्न या तत्वावर ०४ टक्के दराने दरमहा परतावा देण्याचे आमिष दाखवुन फिर्यादी माजी सैनिक संजय बिन्नर व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन एकुण १,३८,५०,००० /- एवढ्या रक्कमेची फसवणुक केली होती त्यावरुन देवळाली कॅम्प पोलिस ठाणे येथे गु.र.नं. ५४ / २०२३ भादंविक १२०(ब), ३४, ४०६, ४०९, ४२० सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ प्रमाणे दिनांक १८/०३/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक शहर करीत होते
सदर गुन्हयातील फिर्यादी व साक्षीदार हे माजी सैनिक असुन त्यांची फसवणुक झालेबाबतच्या गुन्हयाचा संदीप कर्णीक, पोलिस आयुक्त, नाशिक शहर यांनी आढावा घेवुन गुन्हयातील आरोपी तात्काळ अटक करुन पुढील तपास करणेबाबत पोलिस उपायुक्त(,गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे), डॉ. सिताराम कोल्हे, यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस उपायुक्त (गुन्हे) यांनी सदर गुन्हयाचे गांर्भिर्य ओळखुन गुन्हयातील सराईत पांढरपेशीय गुन्हेगार यास अटक करणेबाबत गुंडा विरोधी पथक यांना आदेशीत केले होते.
त्याअनुषंगाने गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सपोनि ज्ञानेश्वर मोहिते व पथकातील पोलिस अंमलदार यांनी सदर गुन्हयातील सराईत गुन्हेगाराचा कोणताही सुगावा नसतांना तांत्रिक व मानवी कौशल्य वापरुन आरोपी हा राज्य कर्नाटक, बिहार, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, याराज्यात आपले ओळख लपवुन फिरत असल्याबाबत माहिती काढुन सध्या तो राज्य गोवा याठिकाणी असुन तो नेपाल देशात पळुन जाणार असलेबाबत माहिती मिळाल्याने पोलिस आयुक्त यांचे आदेशाने दिनांक ३१/०३/२०२४ रोजी गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सपोनि ज्ञानेश्वर मोहिते व पथकातील पोलिस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे हे पणजी राज्य गोवा याठिकाणी जावुन गुन्हयातील आरोपी युवराज बाळकृष्ण पाटील वय ४२ वर्षे रा. बेळगाव राज्य कर्नाटक यास इडन रॉक बिल्डींग, शांतीनेझस चर्च जवळ, पणजी, गोवा या परिसरात सापळा लावुन शिताफीने ताब्यात घेतले. त्याचे कडुन निरनिराळया कंपनीचे एकुण ०७ मोबाईल फोन अंदाजे किंमत १,९०,००० /- रू व पासपोर्ट असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यास पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक शहर यांचे ताब्यात देण्यात आले
आहे.
सदरची कामगिरी.पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव,सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे), डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलिस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, मलंग गुंजाळ, डी. के. पवार, सुनिल आडके, राजेश सावकार, नितीन गौतम, गणेश नागरे, निवृत्ती माळी, प्रविण चव्हाण, सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.




