
जबरी चोरीच्या गुन्हयाची गंगापुर पोलिसांनी २४ तासांचे आत केली उकल…..
जबरी चोरीच्या गुन्हयाची गंगापुर पोलिसांनी २४ तासांचे आत केली उकल…..


नाशिक(शहर प्रतिनिधी) –याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गंगापुर पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातील महिला कार्तिकी अंबादास आहिरे हि दि.(२३) रोजी रात्री ०८.०० वाजेच्या सुमारास दुध घेण्याकरिता दर्शील अपार्टमेंट, अहिल्याबाई होळकर चौक, शिवाजीनगर, नाशिक या सोसायटीचे पार्कींग मधुन एकटीच पायी जात असतांना सदर पार्किंगमधे आधीच लपुन बसलेला त्याच परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार मयुर गजानन वांद्रेकर याने पाकींगमध्ये लाईट नसल्याचा फायदा घेवुन नमुद महिलेस चाकुचा थाक दाखवुन तिला जिवे ठार मारण्याची धमकी देवुन तिच्या हातातील विवो कंपनीचा मोबाईल फोन हिसकावुन घेवुन पळून गेला होता.

त्यानंतर सदर महिला हिने दिलेल्या तक्रारीवरून गंगापुर पोलिस ठाणे येथे गुरनं. ४९/२०२४ भादविक. ३९२, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करून नमुद आरोपींचा शोध घेतला असता नमुद आरोपी हा खंबाळे ता. अंबकेश्वर जि. नाशिक याठिकाणी लपुन बसलेला असल्याची माहिती गुन्हेशोथ पथकाचे अंमलदार सुजित जाधव यांना मिळाली असता त्यांनी सदरची माहिती गंगापुर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना कळविली तेव्हा त्यांनी सदरबाबत वरिष्ठांना कळवुन त्यांची परवानगी घेवुन गंगापुर पोलिस ठाण्याचे गुन्हेशोथ पथकाचे पोहवा गिरीष महाले व सुजित जाधव यांना सदर ठिकाणी रवाना केले त्यावेळी आरोपी मयुर
गजानन वांद्रेकर वय २६ वर्षे रा. यशोधन डी, रुम नं. १, मराठी शाळेच्या बाजुला, शिवाजीनगर, नाशिक हा खंबाळे येथील पारदेश्वर मंदीरात मिळुन आला. त्यावेळी त्यास ताब्यात घेवून पोलिस ठाणे येथे आणुन त्यांस नमुद गुन्हयात अटक करून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्हयात चोरी केलेला
रुपये १०,०००/- किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन व गुन्हयात वापरलेले शस्त्र त्याचेकडुन हस्तगत करण्यात आलेले असुन सदर गुन्हयावा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक संजय भिसे है करित असुन त्यास मा. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ०१ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उप आयुक्त, परिमंडळ – १, किरणकुमार चव्हाण, पोलिस उप आयुक्त, सहा. पोलिस आयुक्त सरकारवाडा विभाग सिध्देश्वर धुमाळ यांचे मार्गदर्शना खाली गंगापुर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोउनि. संजय भिसे, पोहवा. गिरीष महाले, गणेश रहेरे, पोअं/ सोनु खाडे, सुजित जाधव, सर्व नेमणुक गंगापुर पोलिस स्टेशन यांनी केली



