बनावट नंबरप्लेट लावणाऱ्यावर नाशिक गुन्हे शाखेची कारवाई…
बनावट नंबरप्लेट लावणाऱ्यावर नाशिक गुन्हे शाखेची युनीट १ ची कारवाई…
नाशिक (प्रतिनिधी) – बोलेरो चारचाकी वाहनावर बनावट नंबर टाकून वाहन वापरणाऱ्यावर नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ यांच्या पथकाने कारवाई केली आहे. ज्या मध्ये गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करुन बोलेरो वाहन जप्त केले आहे. ही कारवाई बुधवार, (दि.१०एप्रिल) रोजी म्हसरुळ येथील कनसरा माता चौकात करण्यात आली आहे.
संदिप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रशांत बच्छाव, पोलिस उपआयुक्त, गुन्हेशाखा, डॉ.सिताराम कोल्हे, सहा.पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये चोरी होणा-या दुचाकी तसेच फोरव्हिलर वाहनांचा शोध घेऊन चोरी करणा-या इसमांबाबत माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणे बाबत सक्त सुचना दिलेल्या होत्या.
या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.१०एप्रिल) रोजी गुन्हे शाखा, युनीट १, नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोलिस अधिकारी व अंमलदार मोटार सायकल चोरीच्या गुन्हयातील आरोपी व चोरीचे वाहन यांची माहिती काढत असतांना सपोउनि.सुगन साबरे यांना गोपनीय माहीती मिळाली की, पुष्कराज अपार्टमेंट, कनसरा माता चौक, म्हसरूळ नाशिक या ठिकाणी एक पांढ-या रंगाची बोलेरो पिकअप गाडी उभी असुन त्यास बनावट वाहन क्रमांक टाकुन वापरत आहे अशी माहिती वपोनिरी. मधुकर कड यांना कळविली असता, वपोनिरी मधुकर कड यांनी पोउनि.चेतन श्रीवंत, पोहवा. कोळी, पोहवा. देविदास ठाकरे, पोहवा. योगीराज गायकवाड व चापोअं. समाधान पवार यांचे पथक तयार करून मिळालेल्या बातमीवरून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने वरील नमुद पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे पुष्कराज अपार्टमेंट, कनसरा माता चौक, म्हसरूळ नाशिक, खात्री केली असता एक पांढ-या रंगाची बोलेरो पिकअप गाडी उभी असुन त्यास एम.एच १५-एच.एच-४९९८ असा वाहन क्रमांक दिसुन आला. सदर वाहन क्रमांकाची माहिती घेतली असता सदर वाहनास बनावट नंबरप्लेट लावल्याची खात्री झाली व सदर वाहनाच्या मुळ चेसिस व इंजिन नंबरवरून माहिती घेतली असता सदर वाहनास टी.एन-२२-डी.ए-५०१४ हा क्रमांक असल्याचे निष्पन्न झाले व सदर वाहन हे अक्षय शंकर लामखेडे याचे नावावर असल्याचे आढळून आले. तरी बोलेरो पिकअप गाडीवर बनावट नंबर प्लेट टाकुन वापरणा-या इसमांविरूध्द म्हसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर जप्त मुद्देमाल हा म्हसरूळ पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आला असुन पुढील तपास म्हसरूळ पोलीस ठाणे करीत आहे.
अशा प्रकारे सदरची कामगीरी ही संदिप कर्णिक, पोलिस आयुक्त, प्रशांत बच्छाव पोलिस उपआयुक्त, गुन्हेशाखा, डॉ.सिताराम कोल्हे, सहा.पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सपोनि.हेमंत तोडकर, पोउनि.गजानन इंगळे, पोउनि.वेतन श्रीवंत, सपोउनि.सुगन साबरे, पोहवा. रमेश कोळी, देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, पोना. मिलींदसिंग परदेशी, पोअं.जगेश्वर बोरसे, चालक पोअं. समाधान पवार यांनी केली आहे.