अवैध बेकायदेशीररित्या शस्त्र विक्रीकरीता बाळगणारा गुन्हे शाखा युनीट १ च्या तावडीत सापडला…,

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

बेकायदेशीर रित्या देशी बनावटीचे पिस्तुल  बाळगणारा रेकॉर्ड वरील गुन्हेगारास गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद…

नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त,नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार . प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त,गुन्हेशाखा,   डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणा-या इसमांचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करणे बाबत
सुचना दिलेल्या होत्या व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते.त्यानुसार
दिनांक ३० रोजी गुन्हेशाखा युनिट  १ नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोहवा  प्रविण वाघमारे नापोशि प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदार याचे मार्फतीने बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील गुन्हेगार अरूण दिगंबर बिडगर हा सुविधा पेट्रोल पंपाच्या अलीकडे, ड्रिम कॅसलकडे जाणा-या रोडवर, नाशिक येथे गावठी बनावटीचे पिस्तुल(कटटा) व जिवंत काडतुसे असे विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली होती. सदरची माहीती
पोहवा  प्रविण वाघमारे व नापोशि प्रशांत मरकड यांनी वपोनि  विजय ढमाळ यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा  प्रविण वाघमारे, पोहवा  प्रदिप म्हसदे, विशाल काठे,  संदिप भांड,योगीराज गायकवाड, नापोशि  प्रशांत मरकड व चापोहवा नाझीमखान पठाण यांनी सुविधा पेट्रोल पंपाच्या अलीकडे, ड्रिम कॅसलकडे जाणा-या रोडवर, नाशिक येथे सदर इसमास शिताफीने पकडुन ताब्यात घेतले.
सदर इसमाचे नांव अरुण दिगंबर बिडगर, वय २६वर्षे, रा- केकाण चाळ रामवाडी, पंचवटी नाशिक असे असल्याचे समजल्यावरून त्याचेकडुन ३०,००० /- रुपये कि. चे देशी बनावटीचे पिस्तुल, ०१ जिवंत काडतुसे ५००/- रूपये कि.चे असे हस्तगत करण्यात आले आहे. सदरच्या इसमावर पंचवटी पोलिस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ५/२५ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी  पोलिस आयुक्त. संदिप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हेशाखा,  डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, सपोनि  हेंमत तोडकर,  प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, संदिप भांड, योगीराज गायकवाड नापोशि प्रशांत मरकड, चापोहवा नाझीमखान पठाण,पोशि जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी अशांनी केलेली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!