
MD विकणारा नाशिक गुन्हे शाखा युनीट २ च्या तावडीत सापडला…
नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट २ व आडेगाव पोलिस यांनी संयुक्तिकरित्या केलेल्या कार्यवाहीत MD ड्रग विक्री करणा-या इसमास केले जेरबंद…
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,संदिप कर्णिक, पोलिस आयुक्त,नाशिक शहर यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणां यावर कडक धोरण अवलंबिले असुन त्यांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी अंमली पदार्थ विक्री करणा-यांची माहिती काढुन कडक
करण्याबाबतचे वेळोवेळी गुन्हेशाखेला मार्गदर्शन केले होते.
गुन्हेशाखा युनिट क्र १ चे पोलिस अधिकारी व अंमलदार अंमली पदार्थ विक्री करणा-या इसमांची माहिती काढत असतांना गुन्हेशाखेचे पोलिस अंमलदार विलास चारोस्कर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, सागर शार्दुल याचेकडे एम.डी हा अंमली पदार्थ असुन तो हॉटेल पेशवाच्या पाठीमागे,हनुमान नगरकडे जाणा-या रोडवर आडगाव शिवार, नाशिक या ठिकाणी एम.डी. (मॅफेड्रॉन) पावडर या अंमली
पदार्थाची विक्री करण्याकरीता येणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून सदर ठिकाणी कारवाई कामी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि चेतन श्रीवंत, पोहवा महेश साळुंके,सोमनाथ शार्दुल,देविदास ठाकरे, नापोशि मिलींदसिंग परदेशी, पोशि विलास चारोस्कर, नितीन जगताप, मुक्तार शेख, राजेश राठोड, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, चापोशि समाधान पवार यांचे पथक तयार करून मिळालेल्या माहिती प्रमाणे सदर ठिकाणी जावुन सापळा लावुन एम.डी विक्री करतांना धम्मराज उर्फ सागर बाळासाहेब शार्दुल, वय १८वर्षे, रा-राजवाडा दिंडोरीरोड, भाजी मंडईच्या पाठीमागे, म्हसरूळ नाशिक यास ताब्यात घेवून त्यांच्या अंगझडतीत २७,५००/- रूपये किंमतीची ५.५ ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन) तसेच मोटार सायकल, मोबाईल असा एकुण ८७,५००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन
सदर आरोपीताविरूध्द आडगाव पोलिस ठाणे येथे एन. डी. पी. एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २२ (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हेशाखा युनिट १ व आडगाव पोलिस ठाणे या गुन्हयांचा सखोल तपास करीत असुन सदर गुन्हयातील अटक आरोपी धम्मराज उर्फ सागर बाळासाहेब शार्दुल यास एम.डी. (मॅफेड्रॉन) पुरवठा करणा-या आरोपीतांचा शोध चालु आहे. सदर गुन्हयातील एम.डी. (मॅफेड्रॉन) ही कोठुन आणले याचा सखोल तपास करुन शेवटच्या टोकापर्यंत जाणार आहेत.
नाशिक पोलिसांमार्फत नाशिक शहर हे एम.डी मुक्त करण्याबाबतचे धोरण पोलिस आयुक्त ,नाशिक शहर यांनी अवलंबिले असुन कोणीही अंमली पदार्थ विक्री व सेवन करू नये याबाबत सक्त आदेश दिले आहेत.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक साो., प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त,गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, पोनि प्रविन चव्हान, आडगाव पोलिस ठाणे, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि चेतन श्रीवंत, पोहवा महेश साळुंके, सोमनाथ शार्दुल, देविदास ठाकरे, शरद सोनवणे, रमेश कोळी, धनंजय शिंदे, पोना/मिलींदसिंग परदेशी, पोशि विलास चारोस्कर, नितीन जगताप, राजेश राठोड, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, चापोशि समाधान पवार, मपोशि अनुजा येलवे तसेच आडगाव पोलीस स्टेशनचे पोहवा निलेश काटकर, दादासाहेब वाघ यांनी केलेली आहे.


