नाशिक पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश जनावरांची केली सुटका…
नाशिक पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश जनावरांची केली सुटका…
नाशिक (शहर प्रतिनिधी) – नाशिक मध्ये गोवंश जनावरांची कत्तलीसाठी राजरोसपणे वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. या मध्ये पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर कत्तलीसाठी आणलेल्या १० गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करून गोशाळेमध्ये जमा केले. आरोपीतांनी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची हत्या बंदी कायदा लागु असतांना सुद्धा सदर कायदयाचे उलंघन करून गोवंश जातीची जनावरे बेकायदेशीरित्या कत्तलीसाठी आणली म्हणुन इंदिरानगर पोलीस ठाणे येथील महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहरात गोवंश जनावरांची कत्तल करणारे व त्यांचे मांस विक्री करणारे आरोपीतांवर कडक कारवाई करणेबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सक्त आदेश दिले होते. तसेच पोलिस आयुक्त यांनी गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांची नाशिक शहर आयुक्तालय कार्यक्षेत्रात गोवंशीय जनावरांची कत्तल व त्यांची मांस विक्री करावयाचे कारवाई बाबत नोडल अधिकारी म्हणुन नियुक्ती करून पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त, (गुन्हे) डॉ. सिताराम कोल्हे, यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते.
त्या अनुषंगाने (दि.२४मे) रोजी रात्री गुंडा विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार रात्रगस्त करीत असतांना पोलिस हवालदार विजय सुर्यवंशी यांना माहिती मिळाली की, वडाळागांव इंदिरानगर येथे चारचाकी वाहनामध्ये गोवंशीय जातीचे जनावरे कत्तलीसाठी येणार आहे. सदर बातमी गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी सपोनि ज्ञानेश्वर मोहिते यांनी पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, यांना माहिती देवुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळागांव , इंदिरानगर परिसरात सापळा रचला असता (दि.२५मे) रोजी सकाळी ०७.३० वा.सू. इसम अक्रम शेख यांच्या मालकीची जागा बिस्मिल्लाह लॉन्स समोरील पत्र्याच्या शेड मध्ये, वडाळा गांव, नाशिक येथे आरोपी १) रिझवान नुरआलम शेख (वय २६) रा.चौक मंडई बिरबल आखाडया जवळ नाशिक २) अय्याज फैय्याज बागवान (वय ४० वर्षे) रा.बागववान पुरा नाशिक, यांनी एक पिकअप बलेरो चार चाकी वाहन क्रंमाक एम एच -०६-बी डब्ल्यू-२०१६ मध्ये १० गोवंश जातीचे जनावरे बेकायदेशीर रित्या कत्तलीसाठी आणली होती
सदरची गोवंश जातीची जनावरे आरोपी १) सद्दाम बबलु कुरेशी २) नदीम चाँद शेख ३) अजीज कदीर कुरेशी यांचे सांगणे वरुन गिरणारे परीसरातुन कत्तलीसाठी आणले होते. त्यावेळी गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन शिताफीने आरोपी १) रिझवान नुरआलम शेख, २) अय्याज फैय्याज बागवान यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातील कत्तलीसाठी आणलेले १० गोवंश जातीचे जनावरांची सुटका करून तपोवन येथील गोशाळेमध्ये जमा केले. सदर आरोपींनी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची हत्या बंदी कायदा लागु असतांना सदर कायदयाचे उलंघन करून गोवंश जातीची जनावरे बेकायदेशीरित्या कत्तलीसाठी आणली म्हणुन इंदिरानगर पोलिस ठाणे येथील महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा प्रकारे सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त(गुन्हे), प्रशांत बच्छाव,सहा पोलिस आयुक्त (गुन्हे), डॉ. सिताराम कोल्हे, यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा.पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलिस शिपाई विजय सुर्यवंशी, अक्षय गांगुर्डे, मलंग गुजांळ, डी. के. पवार, सुनिल आडके, राजेश सावकार, निवृत्ती माळी, प्रविण चव्हाण, नितीन गौतम, गणेश नागरे, प्रदिप ठाकरे, गणेश भागवत यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे.