गावठी मोहादारु निर्मितीसाठी लागणारा तुरटी व काळ्या गुळाचा मोठा साठा नाशिक ग्रामीण पोलिसांनी केला जप्त…
हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा काळा गुळ व तुरटीचा अवैध साठा केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखा व देवळा पोलिसांची संयुक्तिक कारवाई….
नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे,त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे, देवळा तालुक्यातील लोहनेर गावचे शिवारात काही संशयीत हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य काळा गुळ व तुरटीचा मोठ्या प्रमाणावर अवैध साठा विनापरवाना कब्जात बाळगुन विक्री करण्याचे उद्देशाने साठवणुक करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.
सदर बातमी प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व देवळा पोलिसांनी लोहनेर गावचे शिवारात इसम प्रदिप आनंदा बच्छाव, वय ३८, रा. लोहनेर, ता. देवळा, जि. नाशिक याचे घरातील गोडऊन मध्ये छापा टाकला. सदर ठिकाणावर हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे काळे गुळाच्या एकुण २४५ भेल्या (२२०० किलो), तसेच १०७ किलो तुरटी असा एकुण ६८,२९०/- रू. किं.चा अवैध साठा जप्त करण्यात आला.
यातील इसम हा हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा वरील अवैध साठा विनापरवाना बेकायदेशीररित्या विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना मिळुन आला असून त्याचे विरूध्द देवळा पोलिस ठाणे येथे गुरनं १९९/२०२४ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणीही इसम विनापरवाना बेकायदेशीररित्या हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य साधने साठवणुक करून विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगत असेल तर अशा इसमांविरूध्द कारवाई करण्यासाठी नजीकचे पोलिस स्टेशनला संपर्क साधावा.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलिस अधिक्षक मालेगाव अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, पोउनि दत्ता कांभीरे, पोहवा गिरीष निकुंभ, सुभाष चोपडा, शरद मोगल तसेच देवळा पो.स्टे. चे पोहवा गवळी, कोरडे, पोना मोरे, मपोना चव्हाण यांचे पथकाने केली