सराईत सोनसाखळी चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने अहील्यानगर येथुन घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

चैन स्नॅचिंग करणारे आंतरजिल्हयातील सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर येथुन घेतले ताब्यात,जबरी चोरीचे अनेक गुन्हे केले उघड….





नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.२९ नोव्हे २०२४ रोजी सायंकाळचे सुमारास सिन्नर शहरातील सदरवाडी रोडवर अज्ञात दुचाकीस्वारांनी भरधाव वेगाने येवुने पायी चालणार्या एका महिला शिक्षीकेचे गळयातील सोन्याची पोत जबरीने हिसकावुन चोरी करून नेले बाबत सिन्नर पोलिस ठाणे येथे गुरनं ९०४/२०२४ भा.न्या.सं. ३०४,३(५) प्रमाणे गुन्हा नोंद होता.



त्याचप्रमाणे दि. ०२ डिसेंबर २०२४ रोजी सुध्दा दुपारचे सुमारास सिन्नर- शिर्डी महामार्गावर मुसळगाव शिवारात काळे रंगाचे दुचाकीवर भरधाव वेगाने आलेल्या दोन चोरटयांनी विनर टाऊनशिप, मुसळगाव येथे राहणारे एका महिलेची सोन्याची पोत जबरीने हिसकावुन चोरी केल्याची घटना घडली होती. सदर बाबत MIDC सिन्नर पोलिस ठाणे येथे गुरनं ५८६/२०२४ भा.न्या.सं. क. ३०४, ३ (५) प्रमाणे गुन्हा नोंद  करण्यात आला होता.



या सततच्या होणार्या जबरी चोरी संबंधाने पोलुस अधिक्षक विक्रम देशमाने,अपर पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांनी वरील दोन्ही गुन्हयांचा आढावा घेवून गुन्हे उघडकीस आणणेसाठी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  राजु सुर्वे यांना सदर गुन्हयातील फिर्यादी यांनी आरोपींचे सांगितलेले वर्णन व गुन्हयात वापरलेल्या दुचाकीवरून गोपनीय माहिती घेवून सदरचे गुन्हेगार हे अहिल्यानगर जिल्हयातील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने अहिल्यानगर जिल्हयातील अशोकनगर, ता. श्रीरामपुर परिसरात सतत दोन दिवस पाळत ठेवून सराईत गुन्हेगार  १) अजय संजय पंडीत, वय १९, रा. वडगाव निपाणी, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर यास निष्पन्न केले व  शिताफिने ताब्यात घेतले.

सदर आरोपीस विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार  २) गणेश विजय चव्हाण, रा. अशोकनगर, श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर याचेसह बजाज २२० पल्सर मोटर सायकलवर येवुन सिन्नर शहरात वरील चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.यातील ताब्यात घेतलेला आरोपी अजय संजय पंडीत यास वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून त्याचे कब्जातुन वरील गुन्हयांमध्ये वापरलेली बजाज २२० पल्सर मोटर सायकल, तसेच गुन्हयात चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करून त्याचे वाटयाला आलेली रोख रक्कम १,००,०००/- हस्तगत करण्यात आलेली आहे.

सदर आरोपीचा साथीदार गणेश विजय चव्हाण याचा पोलिस पथक कसोशिने शोध घेत असून सदर आरोपीतांकडून चैन स्नॅचिंगचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.यातील अटक आरोपी अजय संजय पंडीत याचेविरूध्द खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत १) MIDC वाळुंज पो.स्टे. जि. छत्रपती संभाजीनगर गुरनं ५९६/२०२३ भादवि ३७९ २) श्रीरामपुर पो.स्टे. जि. अहिल्यानगर गुरनं ६१/२०२४ भादवि ३९२ ३) लोणी पो.स्टे. जि.अहिल्यानगर गुरनं ५६५/२०२४ भा.न्या.सं. ३०९ (४),३(५)

सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर  मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि संदेश पवार, पोलिस अंमलदार नवनाथ सानप, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने वरील चैन स्नॅचिंगचे दोन गुन्हे उघडकीस आणुन कामगिरी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!