कुप्रसिध्द अट्टल घरफोड्या जिमी शर्मा यास नाशिक ग्रामीण पोलिसांनी शिताफिने घेतले ताब्यात,३५ चे वर गुन्ह्याची केली उकल…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

दिवसा घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जिमी शर्मा यास नाशिक ग्रामीण पोलीसांनी नंदुरबार येथुन केले जेरबंद….

नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. (२७) जुन २०२४ रोजी दुपारचे सुमारास मालेगाव शहरातील जयहिंद कॉलनी परिसरातील बंद धनदाई बंगल्याचे दरवाजाचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने लॉकरमध्ये ठेवलेले सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकुण १९,१९,४००/- रु. किंमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता. सदर बाबत मालेगाव कॅम्प पोलिस स्टेशन येथे गुरनं १५४ / २०२४ भादवि ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा नोंद  होता.
तसेच दि. (१८) जुलै २०२४ रोजी सकाळचे सुमारास देवळा शहरातील ज्ञानेश्वर नगर परिसरातील सप्तश्रृंगी निवास या बंद
घराचे कडी कोयंडा तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने कॉटमध्ये ठेवलेले सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकुन ५,५०,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता. सदर बाबत देवळा पोलिस स्टेशन येथे गुरनं
१४६/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०५ (अ), ३३१ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.





सदर दोन्ही गुन्ह्याचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक  विक्रम देशमाने यांनी वरील दोन्ही गुन्हयांतील आरोपीचा शोध घेवुन गुन्हे
उघडकीस आणण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांनी सदर गुन्हयातील आरोपीची गुन्हा करण्याची पध्दत व तांत्रिक बाबींची पडताळणी करून मिळविलेल्या माहितीच्या
आधारे यातील संशईत आरोपींना निष्पन्न करुन  सदरचे गुन्हे हे नंदुरबार येथील सराईत गुन्हेगार जिमी बिपीन शर्मा याने केले असल्याचे निष्पन्न झाले त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व देवळा पोलिस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी नंदुरबार शहर परीसरात सतत तीन दिवस व रात्र पाळत ठेवून सराईत गुन्हेगार जिमी बिपीन शर्मा उर्फ अर्मित उर्फ दिपक, वय ३१, रा. गुरूकुल नगर, नंदुरबार, जि. नंदुरबार यास शिताफिने ताब्यात घेवुन, सखोल चौकशी केली असता त्याने वरील दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.सदर आरोपीस गुन्हयाचे पुढील तपासकामी देवळा पोलिस ठाणेस हजर करण्यात आले असून पुढील तपास देवळा पोलिस करीत आहे.



सदर आरोपी जिमी शर्मा हा दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याचेकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर आरोपीविरूध्द धुळे, नंदुरबार, नाशिक तसेच हरियाणा राज्यात ३५ पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी – जिमी बिपीन शर्मा उर्फ अर्मित उर्फ दिपक, याचेविरुध्द १) तळोदा पो.स्टे. जि. नंदुरबार गुरनं २८१ / २०२१, भादवि ४५४, ३८० २) तळोदा पो.स्टे. जि. नंदुरबार गुरनं ३१७/२०२१, भादवि ४५४,३८० ३) तळोदा पो.स्टे. जि. नंदुरबार गुरनं ३२२ / २०२१, भादवि ४५७, ३८० ४) तळोदा पो.स्टे. जि. नंदुरबार गुरनं ३८१ / २०२१, भादवि ४५४, ३८० ५) शहादा पो.स्टे. जि. नंदुरबार गुरनं ४२६ / २०२१, भादवि ४५४, ३८०, ३४ ६) शहादा पो.स्टे. जि. नंदुरबार गुरनं १५२ / २०१०, भादवि ४५४, ३८०, ३४ ७) शहादा पो.स्टे. जि. नंदुरबार गुरनं ४० /१७, भादवि ४५४, ४५७, ३८० ८) शहादा पो.स्टे. जि. नंदुरबार गुरनं ३५/१७, भादवि ४५४, ४५७, ३८० ९) शहादा पो.स्टे. जि. नंदुरबार गुरनं ४२६ / २०२१, भादवि ४५१, ४५७ (१०) नंदुरबार शहर पो.स्टे. जि. नंदुरबार गुरनं ४६ / २०२१, भादवि ३०९ ११) नंदुरबार शहर पो.स्टे. नंदुरबार गुरनं १४० / १३, भादवि ४५७,३८० १२) नंदुरबार शहर पो.स्टे. नंदुरबार गुरनं १४७/०९, भादवि ४५४, ३८० (१३) नंदुरबार शहर पो.स्टे. जि. नंदुरबार गुरनं ५६ / १०, भादवि ४५४, ३८० (१४) नंदुरबार शहर पो.स्टे. जि. नंदुरबार गुरनं १४८/१० भादवि ४५४, ३८० १५) नंदुरबार शहर पो.स्टे. जि. नंदुरबार गुरनं १२४ / २०१०, भादवि ३८० १६) नंदुरबार शहर पो.स्टे. जि. नंदुरबार गुरनं १२२ / १० भादवि ४५४,३८० १७) नंदुरबार शहर पो.स्टे. जि. नंदुरबार गुरनं १४६ / १० भादवि ४५४, ३८० (१८) नंदुरबार शहर पो.स्टे. नंदुरबार गुरनं १५२ / १०भादवि ४५४, ३८०, ३४ १९) नंदुरबार शहर पो.स्टे. नंदुरबार गुरनं ३९ / १०, भादवि ४५४, ३८०, ३४ २०) नंदुरबार शहर पो.स्टे. नंदुरबार गुरनं २८/१० भादवि ४५४, ३८०, ३४व२१) नंदुरबार शहर पो.स्टे. नंदुरबार गुरनं ०८ / १२ भादवि ४५४, ४५७,३८० २२) नंदुरबार शहर पो.स्टे. नंदुरबार, गुरनं १४७ / १० भादवि ४५४, ३८० २३) नंदुरबार शहर पो.स्टे. नंदुरबार गुरनं ५६/०९, भादवि ४५४, ३८० २४) नंदुरबार शहर पो.स्टे. नंदुरबार गुरनं ६८ / १० भादवि ४५७, ३८० २५) नंदुरबार शहर पो.स्टे. नंदुरबार गुरनं २१ / १४, मुं.पो.का.क. १२२ २६) नंदुरबार शहर पो.स्टे. नंदुरबार गुरनं ०१ / १०, मुं.पो. का. क. १२४ २७) देवपुर पो.स्टे. जि.धुळे, गुरनं ५८ / २२, भादवि ४५४, ३८०, २०१ २८) देवपुर पो.स्टे. जि. धुळे, गुरनं १३१ / २२, भादवि ४५४,३८० २९) साक्री पो.स्टे. जि. धुळे, गुरनं १६०/२१, भादवि ४५४,३८० ३०) साक्री पो.स्टे. जि. धुळे, गुरनं ११७ / २०२२, भादवि ४५४, ३८० ३१) साकी पो.स्टे. धुळे, गुरनं ६७ / २०१६, भादवि ४५४, ३८०, ३४ ३२) धुळे शहर पो.स्टे.धुळे, गुरनं २००/२०, भादवि ४५४, ३८०, २०१ ३३) झज्जार पो.स्टे., हरियाणा, गुरनं २४ / २०१७, भादवि ४५४, ३८० ३४) झज्जार पो.स्टे., हरियाणा, गुरनं ३२ / २०१७, भादवि ४५४, ३८० ३५) रेवारी शहर पो.स्टे., हरियाणा, गुरनं २७६ / १५, भादवि ४५४, ३८० ३६) रेवारी शहर पो.स्टे., हरियाणा, गुरनं १९४ / १६, भादवि ४५४, ३८० ३७) मॉडेल टाउन रेवारी पो.स्टे., हरियाणा, गुरनं ६८२ / १६, भादवि ३८० ३८) मॉडेल टाउन रेवारी पो.स्टे. हरियाणा, ४७१/१६, भादवि ४५४, ३८० ३९) मॉडेल टाउन रेवारी पो.स्टे., हरियाणा, २६१/१६, भादवि ४५४,३८० ४०) मॉडेल टाउन रेवारी पो.स्टे., हरियाणा, २८८/१६, भादवि ४५७, ३८० ४१) मॉडेल टाउन रेवारी पो.स्टे., हरियाणा, १९८ / १६, भादवि ३८० ४२) मॉडेल टाउन रेवारी पो.स्टे., हरियाणा, ३५१/१६, भादवि ४५४, ३८०



सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलिस अधिक्षक मालेगाव अनिकेत भारती,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी मालेगाव कॅंप यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थागुशाचे पोलिस निरीक्षक  राजु सुर्वे व देवळा पो.स्टे. चे पोलिस निरीक्षक  ज्ञानेश्वर जाधव यांचे पथकातील सपोनि गणेश शिंदे, किशोर जोशी, पोउनि दामोधर काळे, पोहवा नवनाथ सानप, सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, नापोशि विश्वनाथ काकड, विनोद टिळे, देवळा पो.स्टे. चे पोहवा प्रकाश शिंदे, पोशि संदिप चौधरी तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोना हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, भाउसाहेब टिळे, मपोकॉ तृप्ती पवार, प्राजक्ता सोनवणे, नापोशि कुणाल वैष्णव, शैलेश गांगुर्डे, अमोल गांगुर्डे यांचे पथकाने वरील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!