नाशिक येथुन सुरत येथे गुजरात शासनाच्या बसमधुन होणारी महागड्या मद्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा LCB ने केलाय पर्दाफाश….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गुजरात राज्याचे (GSRTC) बसमधुन अवैधरित्या होणारी मद्याची तस्करी रोखण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश…





नाशिक(ग्रामीण)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी निवडणुक आयोग, विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक व नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक  विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये संपुर्ण नाशिक जिल्हयात कडक कारवाई करण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने जिल्हयातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरित्या होणारी मद्याची वाहतुक विक्री रोखण्यासाठी जिल्हयाचे सीमावर्ती भागांमधील चेकपोस्टवर सतर्क नाकाबंदी लावून अवैध
कारवायांना प्रतिबंध घालण्यात येत आहेत. त्यानुसार दिनांक १८/०३/२०२४ रोजी गुजरात राज्य परिवहन महामंडळ (GSRTC), नाशिक सुरत बस क्र. GJ-18-Z-8970 या बसमधून मद्याची
अवैधरित्या तस्करी होत असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळाली होती. त्याप्रमाणे स्था. गु. शा. चे पथकाने नाशिक ते सुरत महामार्गावर दिंडोरी परिसरात सापळा रचुन गुजरात राज्यात जात असलेली वरील बस थांबवुन तपासणी केली असता, त्यामध्ये १,१४,६३५/- किंमतीचा विदेशी मद्यसाठा विनापरवाना अवैधरित्या वाहतुक करतांना मिळुन आलेला आहे. सदर प्रकरणी दिंडोरी पोलिस ठाणे येथे गुरनं १३८ / २०२४ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ (ई)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयात खालील नमुद आरोपीतांना अटक केली आहे.
१) विजय विनोद बलसार, वय ५२ वर्षे, रा. सुरत (बस चालक)
२) अमृतभाई भुवनभाई पटेल, वय ५६ वर्षे, रा. सुरत (बस कन्डक्टर)
सदर गुन्हयात पुढील तपासात किस्मत ब्रॅन्डी शॉप, पंचवटी, नाशिक याचे मालक तसेच अवैध मद्यसाठयाच्या वाहतुकीस मदत करणारे इसमांना पाहिजे असलेल्या आरोपीत दर्शविण्यात आले आहे. तसेच अशा पध्दतीने अन्य कोणी वाईन शॉप चालक / मालक अवैधरित्या मद्याची विक्री, तस्करी करीत असल्यास त्याचेबाबत अधिक माहिती घेवून राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांचे मदतीने पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक  आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रामणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक
राजु सुर्वे, पोहवा प्रविण सानप, किशोर खराटे, पोशि जाधव, बोडके, मोरे यांचे पथकाने  केली .







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!