
गोवा राज्यातील विदेशी दारुची तस्करी करतांना टेम्पोसह एकास घेतले ताब्यात….
नाशिक ग्रामीण स्थागुशाने जप्त केली गोवा राज्य निर्मित महाराष्ट्रात प्रतिबंधित ४३ लाखांचा मद्यसाठा जप्त.….


नाशिक(प्रतिनिधी) – आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सन २०२४ च्या पार्श्वभुमीवर जिल्हयाच्या सीमावर्ती भागांतून गुटखा व मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उगारला आहे.त्यानुसार तसे आदेश सर्व प्रभारीकरीता निर्गमित केलेले आहेत त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हा हद्दीत मुंबई-आग्रा महामार्गावर पेट्रोलिंग करत असतांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नाकाबंदी करुन मुंबई-आग्रा महामार्गाने धुळ्याकडे अवैधरित्या विदेशी मद्याची तस्करी करणारा ट्रक नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोग्रस फाट्यावर पकडला. या ट्रकमधून तब्बल ४३ लाखांचा विदेशी मद्यसाठा पोलिसांच्या हाती लागला असुन सदरील विदेशी मद्य हे गोव्यातील असल्याचे तपासातून समोर आले आहे.

याबाबत सवीस्तर माहीती अशी की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक ते धुळे जाणाऱ्या एका ट्रक मधून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मद्याची तस्करी होत असल्याची बातमी मिळाली होती. त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी (दि.०५एप्रिल) रोजी मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा परिसरात मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सापळा रचुन एका वाहनाची झडती घेतली असता महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत तसेच गोवा राज्य निर्मित व केवळ गोवा राज्यातच विक्री करीता असलेला खालील वर्णनांचा व किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला यातील आरोपी पदमसिंग कैलास बजाड याने गोवा राज्यातुन मद्यसाठा ट्रकमध्ये भरून बिल न बनविता ट्रकमध्ये अमोनियम क्लोराईड पावडरचा माल असल्याचे भासवून त्याचे बनावट बिल पावत्या तयार करून त्या ख-या असल्याचे भासवून अवैधरित्या विदेशी मद्य विक्रीच्या उद्देशाने स्वतःचे कब्जातील ट्रकमध्ये वाहतुक करतांना मिळून आला असुन यावरुन त्याचे विरुध्द पोलिस ठाणे, वडनेर भैरव येथे . गुरनं ९५/२०२४ भादवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई)दाखल करण्यात आला त्यास वरील गुन्हयात अटक करण्यात आली आहे

आरोपीच्या ताब्यातुन एक टाटा टूकसह जप्त केला असुन असुन गोवा राज्य निर्मीत रॉयल ब्लु व्हिस्कीचे ४४८ बॉक्स किं. रू. ४३,००,८००/-, टाटा कंपनीचा ट्रक MH-15-HH-6361 व मोबईल फोन किं.रू. १८,०६,०००/- असा एकूण मुद्देमाल ६१,०६,८००/-रू मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी १) पदमसिंग कैलास बजाड, (वय ३५), रा.जळकु, ता.मालेगाव, जि.नाशिक, हल्ली रा.अश्विननगर, सिडको, नाशिक २) संशयीत पाहिजे असलेला मद्य पुरवठादार व मद्य विकत घेणारे अज्ञात इसम याचा शोध पोलिस घेत आहेत सदर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता, त्याची ०६ दिवस पोलिस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांचे पथकातील सपोनि गणेश शिंदे व अंमलदार करीत आहे.
सदरची कामगिरी ही नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने,अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि गणेश शिंदे, पोउनि नाना शिरोळे, पोहवा नवनाथ सानप, संदिप नागपुरे, मेघराज जाधव, प्रविण गांगुर्डे, नापोशि हेमंत गिलबिले, विनोद टिळे, विश्वनाथ काकड, प्रदिप बहिरम, कुणाल मोरे, नवनाथ वाघमोड यांचे पथकाने केली आहे.


