
त्रंबकेश्वर येथे गोळीबार करुन खुन करणारे नाशिक(ग्रा) पोलिसांनी केले जेरबंद…
त्रंबकेश्वर शहरातील युवकाची गोळया झाडून हत्या करणारे मारेकरी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा व त्रंबकेश्वर पोलिसांची कामगिरी….


नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२१ डिसेंबर २०२४ रोजी त्रंबकेश्वर शहरातील जव्हार रोड परिसरात भगवती नगर कमानी जवळ एका युवक निलेश रामचंद्र परदेशी, रा. पाचआळी, गढई, त्रंबकेश्वर यास त्याचे मामा गोविंद दाभाडे यांनी जमीनीचे मालकी हक्काच्या वादाच्या कारणावरून त्यांचे अज्ञात सहका-यांच्या मदतीने निलेश परदेशी याचेवर गोळीबार करून त्यास जिवे ठार मारले होते यावरुन त्रंबकेश्वर पोलिस ठाणे येथे गुरनं २२९/२०२४ भा.न्या.सं. कलम १०३(१), ३(५) सह भारतीय हत्यार कायदा कलम ३,५, २७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, पेठ विभाग वासुदेव देसले यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून गुन्हयातील अज्ञात मारेकरी-यांच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखा व त्रंबकेश्वर पोलिसांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थागुशाचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे व त्रंबकेश्वर पो.स्टे. चे पोलिस निरीक्षक बिपीनकुमार शेवाळे यांची पथके गुन्हा घडल्यापासून सतत त्रंबकेश्वर, नाशिक शहर तसेच पालघर जिल्हयातील खेडो-पाड्यांमध्ये अज्ञात मारेक-यांचा शोध सुरू होता.

तपासादरम्यान मयत व्यक्तीचा पुर्व-इतिहास व त्याचे सध्याचे दैनंदिन व्यवहारांबाबत गोपनीय माहिती घेण्यात आली, तसेच त्याचे नजीकचे मित्र, नातेवाईक व त्रंबकेश्वर शहरातील नागरीकांकडे याबाबत सखोल चौकशी करण्यात आली, त्यावरून गोपनीय माहिती काढुन म्रुतकास ठार करणारे गुन्हेगार हे मोखाडा व अंजनेरी शिवारातील असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळाली होती. त्यानुसार स्थागुशाचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अंजनेरी व नाशिक शहरातील अंबड परिसरातुन.१) ज्ञानेश्वर सोमनाथ डगळे, वय २५, रा. अंजनेरी, कोळीवाडा, ता. त्रंबकेश्वर २) सुरेंद्र अनंता जोगारे, वय २४, रा. आंब्याचा पाडा, पो. आसे, ता. मोखाडा, जि. पालघर ३) विठ्ठल सोनु बदादे, वय ३०, रा. तळयाचे वाडी, अंजनेरी शिवार, ता. त्रंबकेश्वर यांना निष्पन्न करुन ताब्यात घेतले
वरील तिन्ही संशयीतांकडे तपासाचे कौशल्य वापरून सखोल चौकशी केली असता, त्यांनी व त्याचे इतर साथीदार यांनी डिसेंबर महिन्यात २१ तारखेला सायंकाळचे सुमारास त्रंबकेश्वर ते जव्हार रोड परिसरात यातील मयत इसम निलेश रामचंद्र परदेशी हा त्याचे मोटर सायकलवरून जात असतांना भगवती नगर कमानीजवळ त्याचे अंगावर गोळ्या झाडून त्यास जिवे ठार मारले असल्याबाबत कबुली दिली आहे. यातील वरील तीनही आरोपींना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून, वरील घटनेच्या अनुषंगाने त्यांचेकडे सविस्तर चौकशी करण्यात येत असुन पुढील तपास चालु आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, पेठ विभाग वासुदेव देसले यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, त्रंबकेश्वरचे पोलिस निरीक्षक बिपीनकुमार शेवाळे, सपोनि संदेश पवार, सफौ नवनाथ सानप, शिवाजी ठोंबरे, पोलिस अंमलदार संदिप नागपुरे, विनोद टिळे, मेघराज जाधव, सतिष जगताप, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, प्रविण गांगुर्डे, बापु पारखे, हेमंत गरूड, किशोर खराटे, नवनाथ वाघमोडे, रविंद्र गवळी, तानाजी झुरडे तसेच त्रंबकेश्वर पो.स्टे. चे पोलिस अंमलदार सचिन गवळी, श्रावण साळवे यांनी केली


