त्रंबकेश्वर हद्दीतुन चोरीस गेलेली कार स्थागुशा पथकाने अहमदनगर येथुन घेतली ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

त्रंबकेश्वर येथुन अलिशान कार चोरणारा बीड जिल्हयातील सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद….

नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्हा अभिलेखावरील किंमती मालाविरूध्दचे प्रलंबित  गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. त्यानूसार अपर पोलिस
अधीक्षक नाशिक ग्रामीण  आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रलंबित असलेल्या गुन्ह्यामधे आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे सध्याचे राहण्याचे वास्तव्य याबाबत माहिती काढून समांतर तपास करीत आहेत.त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्रंबकेश्वर पोलिस ठाणेकडील गुरनं २९७ / २०२३
भादवि कलम ३७९ या गुन्हयाचा समांतर तपास करीत होते. सदर गुन्हयात दिनांक २१/११/२०२३ रोजी त्रंबकेश्वर शहरातील जव्हार फाटा परिसरात मराठा आरक्षण आंदोलनाचे कार्यक्रमस्थळावरून
कोणीतरी अज्ञात आरोपींनी गर्दीचा फायदा घेवून फिर्यादी यशवंत महाले, रा. वाढोली, ता. त्रंबकेश्वर यांची नवीन हयुंडाई क्रेटा कारची चावी हातचलाखीने काढून, सदर हयुंडाई क्रेटा चोरी केली होती. सदर गुन्हयाचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोहवा नवनाथ सानप यांना खब-यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, वरील चोरीस गेलेल्या कारचे वर्णनाप्रमाणे सदरची कार ही पाथर्डी, जिल्हा अहमदनगर परिसरात असल्याचे निदर्शनास आले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  राजु सुर्वे यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अहमदनगर व बीड जिल्हयातील गुन्हेगारांची माहिती घेवून बीड शहारातून सराईत गुन्हेगार नामे १) परशुराम मोहन गायकवाड, वय २४, रा. बीड, जि. बीड यास पाळत ठेवून ताब्यात घेतले. त्यास
विश्वासात घेवून वरील गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता, त्याने व त्याचा साथीदार नामे २)तुकाराम अशोक पांचाळ, रा. अंकुशनगर, बीड, जि. बीड याचेसह वरील गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
सदर कारबाबत माहिती घेतली असता, यातील आरोपींकडून १५ दिवसांपूर्वी पाथर्डी शहरानजीक सदर कारचा अपघात झाला असल्याचे समजले आहे, सदरची कार ही अपघातग्रस्त स्थितीत पाथर्डी पोलिस ठाणे येथे जमा असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील आरोपी परशुराम मोहन गायकवाड व त्याचा साथीदार तुकाराम अशोक पांचाळ हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर
यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, चारचाकी वाहने चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यातील ताब्यात घेतलेला आरोपी परशुराम गायकवाड यास त्रंबकेश्वर पोलिस ठाणेकडील वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून त्याचेकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.





सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक  विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि गणेश शिंदे, पोहवा नवनाथ सानप, पोकॉ विनोद टिळे, चापोना निवृत्ती फड यांचे पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!