पुलवामा मध्ये सुरक्षा दलाशी चकमक, एक दहशतवादी ठार!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

पुलवामा मध्ये सुरक्षा दलाशी चकमक, एक दहशतवादी ठार!

जम्मू काश्मीर – दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी दहशतवादी आणि सैन्यात चकमक सुरू झाली. मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांना या भागात दहशतवादी असल्याची पुष्टी माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार केला. त्याचं चकमकीत रुपांतर झालं. या चकमकीत दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सैन्याच्या जवानांना यश आलंय.





प्राप्त माहितीनुसार या भागात दोन ते तीन दहशतवादी लपून बसले आहेत. तर सैन्याच्या 55 राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि पोलिसांनी संयुक्तपणे परिसराला वेढा घातलाय. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. उल्लेखनीय म्हणजे बुधवारी पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी आणि सैन्य यांच्यात झालेल्या चकमकीला जवळपास एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, शोपियान जिल्ह्यात अज्ञात लोकांनी परप्रांतीय व्यक्तीची हत्या केली होती.



सध्या खोऱ्यात राजकीय घडामोडी जोरात सुरू आहे. दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी आणि जनतेला सुरक्षितता मिळवून देण्यासाठी पोलीस आणि सैन्य विविध भागात शांतता राखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिल्यावर दहशतवाद्यांनी सर्च पार्टीवर गोळीबार केल्याची पुष्टी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली. एक दहशतवादी मारला गेला असण्याची शक्यता आहे. त्याचा मृतदेह अद्याप तो सापडलेला नाही. आणखी एक दहशतवादी अडकल्याची शक्यता आहे. सैन्यदलाकडून प्रत्युत्तरात गोळीबार सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय.



गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार लष्कर ए तैय्यबाचा कमांडर जुनैद अहमद भट हा सध्या कुलगाममध्ये लपून बसला आहे. त्याने नुकतीच काही स्लीपर सेलबरोबर बैठक केली असून काश्मीर खोऱ्यात लष्करचे स्लीपर सेल सक्रीय केले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर दहशतवादी संघटना जम्मू काश्मीरमध्ये मोठा घातपात करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!