
१७ वर्षीय मुलगी चालवायची सेक्स रॅकेट,नवी मुंबईतील हॅाटेलमधुन चालायचा देहविक्रीचा कारभार,
नवी मुंबई(प्रतिनिधी)- नवी मुंबईत सेक्स रॅकेटबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईत एका हॉटेलमध्ये छापा टाकण्यात आल्यानंतर सेक्स रॅकेटचा खुलासा झाला. पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती धक्कादायक अशी आहे. सेक्स रॅकेट १७ वर्षीय मुलगी चालवत होती. पोलिसांनी छाप्यात काही जणांना ताब्यात घेतलं असून ४ महिलांची सुटका करण्यात आलीय. महिलांना वेश्याव्यवसायात जबरदस्तीने ढकलण्यात येत होतं.
पोलिसांना सेक्सरॅकेटबाबत माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यासाठी ह्युमन ट्राफिकिंग सेलला पाठवण्यात आले होते. वाशी परिसरातील एका हॉटेलमध्ये छापा मारण्यात आला. यासाठी एका बनावट ग्राहकाला पाठवले होते. त्याच्या पाठोपाठ इतर टीम
गेल्यानतंर रॅकेट उघडकीस आलं आहे.


पोलिसांनी सांगितले की, सुरुवातीच्या तपासात अशी माहिती समजते की १७ वर्षांची मुलगी हे रॅकेट चालवत होती. अल्पवयीन मुलगी मालाडमध्ये राहत होती. FIR नुसार मुलगी वेश्याव्यवसायातून मोठी कमाई करत होती आणि ज्या महिलांना या व्यवसायात ढकलण्यात आलं होतं त्यांना तुटपुंजी रक्कम मिळत
होती. पोलिसांनी छाप्यानंतर ४ जणींची सुटका केली. त्यांचे वय 20 वर्षे इतकं आहे. यातील एक तरुणी नेपाळची तर दोन बिहारच्या राहणाऱ्या आहेत. ताब्यात घेतलेल्या मुलींना पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले असून त्यांचे काउन्सिलिंग केले जाणार आहे.
पोलिसांनी घटनास्थळी एक मोबाईल फोन, महागडं घड्याळ आणि रक्कम जप्त केली. इतकंच नाही तर दीड लाख रुपयांच्या बनावट नोटाही जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मानवी तस्करीच्या अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



